Fake ई-मेल ओळखायचा असेल तर तात्काळ फॉलो करा ‘या’ टिप्स, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या दररोज ऑनलाइन फसवणुकीच्या हजारो घटना देशात घडत आहेत. या प्रकरणांवरून समोर आले आहे की, बहुतांश बाबतीत हॅकर्स लोकांना फेक ई मेल पाठवून जाळ्यात ओढतात. अशावेळी हे जाणून घेणे खूप जरुरी आहे की, बनावट ई मेल कसा ओळखायचा. आज आम्ही तुम्हाला काही टिप्स देणार आहोत, ज्या तुमच्या खूप उपयोगी येतील. जाणून घेऊयात…

1 शब्दांवर लक्ष द्या
फेक ई मेलची ओळख करण्यासाठी सर्वप्रथम यामध्ये लिहिले गेलेल्या टेक्स्टमधील स्पेलिंग आणि ग्रामर चेक करा. अनेकदा हॅकर्स ई मेलमध्ये चुकीचे स्पेलिंग लिहितात. मात्र, खर्‍या मेलमध्ये स्पेलिंग किंवा ग्रामरची चूक नसते.

2 लोकप्रिय कंपन्यांच्या नावांचा घेतात आधार
हॅकर्स जगातील दिग्गज कंपन्यांच्या नावाचा आधार घेऊन फसवण्याचा प्रयत्न करतात. अशा ई मेलमधील लिंकवर कधीही क्लिक करू नका, अन्यथा तुमचे अकाउंट रिकामे होऊ शकते. कंपन्या लोकांना थेट ई-मेल पाठवत नाहीत.

3 यूआरएल चेक करा
ई मेलमध्ये आलेल्या लिंकचा यूआरएल ओळखण्याचा प्रयत्न करा. खरा यूआरएल https ने सुरू होतो, तर बनावट http ने सुरू होतो.

4 ई मेलमध्ये आलेल्या अटॅचमेंटवर क्लिक करू नका
बहुतांश हॅकर्स यूसर्जला जाळ्यात ओढण्यासाठी फेक ई मेलमध्ये अटॅचमेंट पाठवतात. अशा अटॅचमेंटवर चूकुनही क्लिक करू नका. अगोदर ई मेलचा तपास करा आणि त्यानंतरच अटॅचमेंटवर क्लिक करा.