Pan Aadhar Linking : काही मिनिटांत तुमचं पॅन कार्ड आधार कार्डशी करा लिंक, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  पॅन कार्डला आधारशी लिंक करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2021 आहे. जर आपण अद्याप पॅन कार्ड आधारशी लिंक केलेला नसेल तर त्वरित करा. अन्यथा आपले पॅन कार्ड रद्द केले जाऊ शकते आणि आपल्याला 10,000 रुपयांपर्यंत दंड लागू शकतो. अश्या परिस्थितीत जाणून घेऊया पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करण्याची संपूर्ण प्रक्रिया …

अश्या प्रकारे पॅनसह आधार कार्ड करा लिंक :

– सर्व प्रथम आपल्याला आयकर ई-फाइलिंग पोर्टल www1.incometaxindiaefiling.gov.in वर लॉग इन करावे लागेल

– यानंतर वेबसाइटच्या डाव्या बाजूला तुम्हाला ‘लिंक आधार’ हा पर्याय दिसेल. आपल्याला या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

– यानंतर आपल्यासमोर एक नवीन टॅब उघडेल.

– यामध्ये तुम्हाला पॅन क्रमांक, आधार क्रमांक आणि आधार कार्डमध्ये प्रविष्ट केलेले नाव टाकावे लागेल.

– यानंतर अटी व शर्तींना ओके करून आणि कॅप्चा कोड भरून आपण या दोन कागदपत्रांना लिंक करू शकता.

– यानंतर आपल्याला कन्फर्मेशन मिळेल आणि जर तुमची दोन्ही कागदपत्रे आधीपासूनच लिंक झाली असतील तर तुम्हाला त्याबद्दलही माहिती मिळेल.

sms सह आधार आणि पॅन कार्ड करा लिंक :

– त्यासाठी तुम्ही मोबाईलवर मेसेज बॉक्समध्ये जाऊन UIDPN टाईप करा

– स्पेस देऊन पॅन व आधार कार्ड क्रमांक प्रविष्ट करा

– आता ते 567678 किंवा 56161 क्रमांकावर पाठवा

– यानंतर, आयकर विभाग आपले दोन नंबर लिंक करण्याच्या प्रक्रियेत ठेवेल.