WhatsApp वरील महत्वाचे मेसेज चुकून डिलीट झाले तर ‘नो-टेन्शन’, ‘या’ स्मार्ट पध्दतीनं ‘रिकव्हर’ करा संपूर्ण चॅट, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाईन टीम : कधी कधी आपल्याकडून चुकून WhatsApp वरचे महत्वाचे मॅसेज डिलीट होतात, ज्यामुळे अडचण निर्माण होऊ शकते. आम्ही तुम्हाला अशा काही स्मार्ट टिप्स सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही डिलीट झालेले मॅसेज पुन्हा मिळवू शकता.

– जर तुम्हाला डिलीट झालेले मॅसेज पुन्हा मिळवायचे असतील तर, गुगल ड्राइव्ह एक ऑप्शन असू शकतो. त्यासाठी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि गुगल अकाउंट टाकावं लागेल.

असं रेस्टोअर करा बॅकअप
– एकदा WhatsApp अनइन्स्टॉल करून पुन्हा इन्स्टॉल करा.

– त्यानंतर WhatsApp ओपन करून तुमचा नंबर व्हेरिफाय करा.

– त्यानंतर तुम्हाला तुमचा चॅट गुगल ड्राइव्ह वरून रिस्टोअर करण्याचा पर्याय दिसेल.

– रिस्टोअर पूर्ण झालं तर, नेक्स्ट वर क्लीक करा. त्यानंतर तुमची चॅट रिस्टोअर होईल.

– चॅट रिस्टोअर झाल्यानंतर WhatsApp तुमची मीडिया फाईल रिस्टोअर करण्यास सुरु करेल.

– जर WhatsApp गुगल ड्राइव्हच्या आधीच्या बॅकअप शिवाय इन्स्टॉल केलं, तर WhatsApp आटोमॅटिकली तुमची लोकल बॅकअप फाईल रिस्टोअर करेल.

– जर तुम्ही लोकल बॅकअपचा वापर केला तर, तुम्हाला कंप्युटर, एसडी कार्डचा वापर करून तुमच्या फाईलला दुसऱ्या मोबाईलमध्ये ट्रान्सफर करावं लागेल.

काही महत्वाची माहिती
– तुमचा फोन लोकल बॅकअप फाईलला एका आठवड्यात स्टोअर करत असतो.

– लोकल बॅकअप आटोमॅटिकली रोज सकाळी 2 वाजता क्रिएट होतो आणि फोन मध्ये सेव्ह होतो.

बॅकअपला रिस्टोअर करण्याचे आणखी काही टिप्स

– जर तुम्हाला लोकल डेटा होण्यापासून वाचवायचं असेल तर तुम्हाला या टिप्स उपयोगी पडतील.

– फाईल मॅनेजर ऍप डाउनलोड करा.

– फाईल मॅनेजर ऍप एसडी कार्ड, WhatsApp, Databases मध्ये नेव्हिगेट केला तर तो डेटा एसडी कार्डमध्ये स्टोअर होत नाही.