Google Maps ला ‘इंटरनेट’शिवाय वापरण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   गुगल मॅपच्या मदतीने कुठेही जाणे-येणे आणि लोकेशन जाणून घेणे सोपे झाले आहे. लोकांमध्ये गुगल मॅपने एक विश्वासू नेव्हीगेशन अ‍ॅप म्हणून आपले स्थान निर्माण केले आहे. अशात जर तुम्ही कुठे बाहेर आहात आणि तुमचे इंटरनेट काम करत नसेल तर तुम्हाला अशावेळी टेन्शन येते, परंतु खराब इंटरनेट किंवा विना इंटरनेटसुद्धा तुम्ही गुगल मॅपचा आरामात उपयोग करू शकता. यासाठी तुम्हाला इंटरनेटची गरज भासणार नाही. इंटरनेटशिवाय गुगल मॅपचा उपयोग कसा करावा, याविषयी आम्ही काही सोप्या टिप्स तुम्हाला सांगणार आहोत.

तुम्ही कुठे बाहेर जाणार असाल तर अगोदरच त्या जागेचे नेव्हीगेशन म्हणजेच मॅप डाऊनलोड करू शकता आणि रस्त्यात तुम्ही इंटरनेटशिवाय सुद्धा गुगल मॅपवर त्या नेव्हीगेशनचा वापर करू शकता. अँड्रॉइड आणि आयफोनमध्ये ऑफलाईन मॅप डाऊनलोड करणे म्हणजे इंटरनेटशिवाय गुगल मॅपचा कसा वापर करायचा, ते जाणून घेवूयात…

आयफोनमध्ये ऑफलाईन मॅप डाऊनलोड करण्याची पद्धत

यासाठी तुम्हाला आपल्या आयफोन किंवा आयपॅडवर सर्वप्रथम गुगल मॅप ओपन करावे लागेल. यानंतर त्यामध्ये साईन इन करा. परंतु, यासाठी इंटरनेट कनेक्शनची गरज आहे.

गुगल मॅपमध्ये साईन इन केल्यानंतर त्या जागेला सर्च करा जेथे तुम्ही जाण्याचे ठरवले आहे. जसे की डेहरादून. नंतर तेथे जागेच्या नावासह अ‍ॅड्रेस टाका आणि मोअरच्या बटनवर टॅप करा. येथे ऑफलाईन मॅपसाठी डाऊनलोडचा पर्याय सिलेक्ट करावा. तो सिलेक्ट करून तुम्ही त्या जागेचा मॅप डाऊनलोड करा आणि त्यानंतर तुम्हाला मॅपचा वापर करण्यासाठी इंटरनेटची गरज भासणार नाही.

अँड्रॉईड डिव्हाईसमध्ये ऑफलाईन मॅप असा डाऊनलोड करा

जर तुम्ही अँड्रॉईड फोन यूजर्स असाल तरीसुद्धा तुम्हाला आयफोनप्रमाणेच डिव्हाईसमध्ये गुगल मॅपमध्ये ऑफलाईन मॅप डाऊनलोड करण्याची पद्धत फॉलो करावी लागेल. यामध्ये लक्षात ठेवावे लागेल की, मॅप डाऊनलोड करण्यासाठी इंटरनेट कनेक्शन असणे आवश्यक आहे. मात्र, डाऊनलोड झाल्यानंतर इंटरनेटशिवाय मॅप वापरू शकता. यानंतर तुम्ही ठरवलेल्या ठिकाणी नेव्हीगेशन तुम्हाला आरामात पोहचवते.