WhatsApp वर Messenger Rooms चा करू शकता वापर, जाणून घ्या पूर्ण प्रोसेस

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअपसोबत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकचे फीचर जोडले आहे. यामुळे युजर्स आता फेसबुकचे व्हिडिओ कॉलिंग फीचर मेसेंजर रूमला व्हॉट्सअप वर वापरू शकतात. मात्र, हे सध्या केवळ वेब व्हर्जनवर उपलब्ध असेल. सोप्या शब्दात सांगायचे तर व्हॉट्सअप यूजर्स अ‍ॅप डेस्कटॉपशी कनेक्ट करून व्हिडिओ कॉलिंग फीचर रूमचा वापर करू शकतील. कंपनी व्हॉट्सअपच्या मोबाईल व्हर्जनमध्ये सुद्धा रूम्सची सुविधा लवकरच देणार आहे. सध्या याची टेस्टींग सुरू आहे. याशिवाय व्हॉट्सअप वेब युजरला अ‍ॅपवरच स्क्रीन शेयरिंग आणि नेव्हिगेशनचे ऑपशन सुद्धा दिले जाईल. मसेंजर रूम्सचे ऑपशन यूजर्सला व्हॉट्सअप वेब व्हर्जनच्या 2.2031.4 वर उपलब्ध आहे. मसेंजर रूम्स फेसबुकचे फीचर आहे, ज्याचा शॉर्टकट व्हॉट्सअपवर दिला जाणार आहे.

असा करू शकता वापर
व्हॉट्सअप यूजर्सने पहिले पहावे की त्यांचे अ‍ॅप अपडेट आहे किंवा नाही. जर नसेल तर, ते अगोदर अपडेट करावे लागेल. यासाठी अँड्राइड यूजर्सने गुगल प्लेस्टोरवर जावे. जेथे व्हॉट्सअपचे लेटेस्ट व्हर्जन अपडेट करता येईल.

जर तुम्हाला व्हॉट्सअप वेबवर मेसेंजरवर रूम्सचे ऑपशन अजून मिळत नसेल, तर चेक करा की, तुम्ही लेटेस्ट व्हर्जन वापर आहात किंवा नाही. कंपनी अँड्रॉइड आणि आयओएस बीटा व्हर्जनवर सुद्धा या इंटीग्रेशनची टेस्टींग करत आहे.

अ‍ॅप अपडेट केल्यानंतर यूजरला व्हॉट्सअप डेस्कटॉपशी कनेक्ट करावे लागेल. यासाठी व्हॉट्सअप वेब सुविधा अगोदरच दिली जात आहे. व्हॉट्सअप वर मेसेंजर रूम्सला कनेक्ट करण्याचे दोन ऑपशन आहेत.

पहिल्या ऑपशनमध्ये व्हॉट्सअप वेब स्क्रीनच्या टॉप लेफ्टमध्ये दिसत असलेल्या ऍरोसारख्या सिम्बॉलवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला क्रिएट रूम्स ऑपशन दिसेल, येथे क्लिक केल्यानंतर यूजर मेसेंजरवर नेव्हिगेट करू शकेल.

दुसर्‍या ऑपशनमध्ये यूजरला चॅट स्क्रीन ओपन करून टॉप राईट साईडला दिसत असलेल्या अटॅचमेंट आयकॉनवर क्लिक करावी लागेल, जेथे फोटो, व्हिडिओ आणि कॅमेर्‍यासोबतच रूम्सचा शॉर्टकट आयकॉन दिसेल, येथे क्लिक केल्यानंतर थेट मेसेंजर रूम्सचा वापर करता येईल.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like