Tips and Tricks : Twitter वर कधीही करू नका ‘या’ चुका; अन्यथा हटवली जाईल तुमची ‘ब्लू टिक’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   ट्विटरवर ब्लू टिक चेकमार्क मिळवणे सोपे नसते. यूजरला मोठ्या प्रक्रियेतून जावे लागते. मायक्रो ब्लॉगिंग साइट ट्विटरने मागील तीन वर्षांपासून ब्लू टिक चेकमार्कची रिक्वेस्ट होल्ड करून ठेवली होती. परंतु, आता कंपनी 2021 पासून पुन्हा ब्लू टिक चेकमार्क देण्याचे ठरवले आहे. परंतु कंपनीने यासाठी जुन्या प्रक्रियेचे नियम आणि अटी बदलल्या आहेत. सोबतच ट्विटरकडून ब्लू टिक चेकमार्कचीसुद्धा तरतूद जोडली आहे. अशावेळी ट्विटरवर तुमच्याकडून केली जाणारी एकसुद्धा चूक ब्लू टिक हटवू शकते.

केव्हा हटू शकते ब्लू टिक

* जर तुम्ही ट्विटरवर जास्त अ‍ॅक्टिव्ह राहात नसाल.
* ट्विटरचा यूजरनेस आणि बायो बदलल्यास.
* जर तुम्ही एखाद्या पोस्टसाठी ट्विटर व्हेरिफिकेशन्स केले आहे आणि त्यामध्ये बदल झाला तर.
* जर तुम्ही फॉलोअर वाढवणार्‍या एखाद्या लिंकवर क्लिक केले.
* ट्विटरवर न्यूड, खोटी आणि हिंसेची पोस्ट टाकणे.

ट्विटरने जारी केला ड्रॉफ्ट

ट्विटरकडून काही नियम आणि अटींचा एक ड्रॉफ्ट जारी करण्यात आला आहे. सोबतच ट्विटर व्हेरिफिकेशन्स प्रोग्राम पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली आहे, जो 2017 मध्ये बंद केला होता. परंतु ट्विटर पुन्हा 2021 पासून ब्लू टिक बॅजसाठी व्हेरिफिकेशन्स प्रोग्राम सुरू करत आहे. अशावेळी आता लोक ब्लू टिकसाठी पुन्हा रिक्वेस्ट करू शकतील.

You might also like