‘हे’ आहेत जगातील 5 सर्वात महागडे फोन, कोट्यवधीच्या लक्झरी कारपेक्षा किंमत जास्त

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   जगात काही असेही स्मार्टफोन आहेत, ज्यांची किंमत कोट्यवधी रूपयांच्या लग्झरी कारपेक्षा सुद्धा जास्त आहे. जगातील अशाच सर्वात महागड्या फोनबाबत आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत. सोबत जाणून घेवूयात अखेर या स्मार्टफोनची किंमत इतकी जास्त का आहे…

Falcon Supernova I phone 6 pink diamond
किंमत- 4.8 कोटी रुपये

Falcon Supernova I phone 6 स्मार्टफोनची मॅन्युफॅक्चरिंग कंपनी Apple आहे. हा फोन फॅलकॉनने डिझाईन केला आहे. हा जगातील सर्वात महागडा आणि लग्झरी फोन आहे. हा आयफोन 6 चे कस्टमाईज मॉडल आहे. तो 24 कॅरेट गोल्डने बनवला आहे, ज्यामध्ये हिरे लावले आहेत, त्याची केस सुद्धा रोज गोल्ड प्लॅटिनमने बनवलेली आहे.

iPhone 4S Elite Gold
किंमत – 0.940 कोटी रुपये

iPhone 4S Elite Gold हा Stuart Hughes ने डिझाईन केला आहे. यामध्ये सुमारे 500 हिरे लावले गेले आहेत. हा पूर्णपणे 24 कॅरेट गोल्डने बनवला आहे. तर रियरमध्ये Apple चा logo सुद्धा 53 हिर्‍यांनी कव्हर केला आहे. यामध्ये प्लॅटिनमसह डायनासोरच्या हाडाचा खरा तुकडा सुद्धा वापरण्यात आला आहे.

iPhone 4 Diaomond rose
किंमत- 0.8 कोटी रुपये

iPhone 4 Diaomond rose हा सुद्धा Stuart Hughes ने बनवला आहे. यामध्ये सुद्धा सुमारे 500 हिरे लावले आहेत. फोन स्टार्ट बटन जवळपास 7.4 कॅरेटचे सिंगल कट हिर्‍यांनी कव्हर करण्यात आले होते.

Goldstriker iPhone 3GS Supreme
किंमत – 0.32 कोटी रुपये

Goldstriker iPhone 3GS Supreme स्मार्टफोन ब्रिटिश डिझायनर Stuart Hughe आणि त्यांची कंपनी Goldstriker ने बनवला आहे. यास 271 ग्रॅमच्या 22 कॅरेटच्या सॉलिड गोल्ड आणि 200 हिर्‍यांसह तयार करण्यात आला होता. Apple च्या लोगोला सुद्धा 53 हिरे आणि स्टार्ट बटनमध्ये सुद्धा पूर्ण एक हिरा सुद्धा लावला होता.

Phone 3G Kinga Button
किंमत- 0.25 कोटी रुपये

आस्ट्रेलियन ज्वेलर Peter Alisson ने iPhone 3G Kinga Button बनवला आहे. याच्या स्टार्ट बटनला एक मोठा हिरा लावण्यात आला आहे. सोबतच यामध्ये 18 कॅरेटचे पिवळे, सफेद आणि रोज गोल्ड हिरे लावण्यात आले आहेत. फोनच्या साईड स्ट्रीपमध्ये 138 हिरे लावले आहेत.