टोकियो ऑलम्पिकमध्ये ‘टेक्नॉलॉजी’चा भरघोस वापर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पुढील वर्षी होणाऱ्या ऑलम्पिक स्पर्धेचे आयोजन हे जपानची राजधानी टोकियोमध्ये केले जणार आहे. जगातील सर्वात मोठी क्रीडा स्पर्धा असलेली ऑलिम्पिक स्पर्धेत यावेळी मोठ्या प्रमाणात नवीन तंत्रज्ञान वापरले जाणार आहे. जाणून घेऊयात याविषयी अधिक माहिती

1)  इलेक्ट्रॉनिक सामानांपासून तयार होणार मेडल
या ऑलम्पिक स्पर्धेत तयार होणारे मेडल हे रिसायकल केल्या जाणाऱ्या इलेक्ट्रॉनिक सामानांपासून तयार केले जाणार आहे. यासाठी जवळपास 62.1 लाख मोबाईल फोनचा देखील वापर होणार आहे. एप्रिल 2017 ते मार्च 2019 पर्यंत हे धातू तयार केले जाणार असून यामधून 5 हजार मेडल्स तयार करण्यात येणार आहे.

2) अपंगांची मदत करणार रोबोट
या स्पर्धत अपंग व्यक्तींची मदत करण्यासाठी आयोजकांनी रोबोट्स देखील तैनात केले आहेत. नागरिकांची हे रोबोट्स विविध प्रकारची नादात करणार आहेत. यासाठी टोयोटा कंपनी काम करत आहे.

3)रोबोट देणार जेवणाच्या वस्तू
टोयोटा लवकरच ह्यूमन सपोर्ट रोबोट आणि डिलिव्हरी सपोर्ट रोबोर्ट बाजारात आणणार आहेत. या ऑलम्पिक स्पर्धत हे रोबोट नागरिकांची जेवणाच्या वस्तू देऊन सोय करणार आहेत. तसेच बाकी विविध प्रकारे देखील सेवा करणार आहेत.

4) इलेक्ट्रिक वाहनांचा वापर
या ऑलम्पिक स्पर्धेत इलेक्ट्रिक वाहनांचा देखील मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येणार असून बॅटरीवर चालणाऱ्या गाड्यांचा यामध्ये वापर करण्यात येणार आहे. यामुळे येथील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना देखील सुविधा मिळणार आहे.

Visit : Policenama.com

तुमच्या मुलांच्या डोळ्यांची अशी घ्या काळजी, उपाय जाणून घ्या
जाणून घ्या ‘सेक्शुअल लाइफ’ असंतुष्ट असण्याची कारणे, अशी घ्या काळजी
चिंच आहे बहुगुणी, उन्हाचा कडाका वाढला तर आवश्य खा

शरीरात ‘या’ ठिकाणी लपतो ‘एड्स’चा व्हायरस, संशोधकांनी केला दावा
मधुमेहाचे औषध स्तनाच्या कॅन्सरवर उपयुक्त, चिनी संशोधकांचे मत
मुलांना कोणत्या वयात शाळेत घालावे? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत
ऑफिसमध्ये जेवण करताना घ्यावी ‘ही’ काळजी, तुमच्यासाठी ठरु शकते फायदेशीर
नाभीवर लावा २ थेंब दारु, दूर होतील पीरियड्ससंबंधीत ‘या’ समस्या, जाणून घ्या