2023 पर्यंत जगातील निम्म्या ‘स्मार्टफोन’च्या बाजारावर असेल 5G चा ताबा : IDC

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : जग वेगाने 5G तंत्रज्ञानाकडे वाटचाल करत आहे. या 5 जी तंत्रज्ञानामध्ये स्मार्टफोनचे मोठे योगदान असणार आहे. दरम्यान, सध्या स्मार्टफोन उद्योगासमोर काही आव्हाने आहेत. परंतु 2022 पर्यंत त्यात सुधारणा होईल अशी अपेक्षा आहे. आयडीसीच्या अहवालानुसार 2023 पर्यंत 5 जी जागतिक स्मार्टफोन बाजाराच्या 50% व्यापण्याचा अंदाज आहे. कोविड – 19 ची साठीची आव्हाने असूनही, सध्या सर्व स्मार्टफोन ओरिजनल इक्यूपमेंट मैन्यूफैक्चर्स (OEMS) साठी सध्या 5G टॉप प्रॉयरिटी लिस्टमध्ये आहे..

बाजारात मागणीचा अभाव
आयडीसी वर्ल्डवाइड मोबाइल डिव्हाइस ट्रॅकर्सचे उपाध्यक्ष, रेयान रीथ म्हणाले की, बाजारपेठ सतत खाली येत असल्याने टॉप वेंडरने 2020 च्या प्रॉडक्शन प्लॅनमध्ये घट केली आहे. अहवालात म्हटले आहे की, कंपन्यांनी त्यांच्या 4 जी पोर्टफोलिओ योजना कमी केल्या आहेत. तसेच कंपन्या वर्ष 2020 अखेरपर्यंत त्यांची 4 जी स्पेस कमी करू शकतात. रीथ म्हणाले की, 5 जी स्मार्टफोनची मागणी सध्या खूपच कमी आहे. अशा आर्थिक परिस्थितीत 5 जी हार्डवेअर आणि सर्व्हिस चार्जवर खूप दबाव असतो.

5 जी किंमतीत कपात होण्याची शक्यता
जगभरातील स्मार्टफोन बाजारात 1.2 बिलियन यूनिटच्या एकून शिपमेंटसह 2020 मध्ये दरवर्षी 9.5 टक्क्यांनी घट होण्याचा अंदाज आहे. दरम्यान, दुसऱ्या तिमाहीच्या निकालात 17 टक्क्यांनी घट आहे, जे अनुमानित घटापेक्षा कमी आहे. दरम्यान, असे निकाल आर्थिकदृष्टया चिंताजनक आहेत. अहवालानुसार, 5 जी स्मार्टफोनचे भविष्य देखील आर्थिक क्रियाकलापांवर अवलंबून असेल. जर मागणी आली नाही तर 5 जी स्मार्टफोनच्या किंमतीत कपात होण्याची शक्यता आहे. दरम्यान चीनमधील मध्यम तिमाहीत, 43% 5G डिव्हाइसची किंमत 400 डॉलर पर्यंत प्रचंड कमी केली गेली आहे.