Airtel – Vodafone च्या ‘या’ युजर्संना प्रत्येक नेटवर्कवर मिळतेय ‘अनलिमिटेड’ फ्री कॉलिंग

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Airtel, Vodafone-Idea आणि Reliance Jio ने आपली प्रीपेड प्लॅनचे नवे दर लागू केले आहेत. कंपन्यांनी आपल्या प्रीपेडच्या दरात जवळपास 43 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

टेलिकॉम कंपन्यांच्या मते ARPU ला ठीक करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. कंपन्यांनी आपल्या व्हाइस कॉलिंगच्या दराबरोबर डाटाचा दर देखील वाढवला आहे. सध्या भारतात डाटाचे दर अन्य विकसनशील आणि विकसित देशांच्या तुलनेत 50 टक्के कमी आहेत. तर टेलिकॉम कंपन्याचा ARPU वर्षानुवर्षे कमी होत आहे. टेलिकॉम कंपन्याचे ARPU 2010 मध्ये 141 रुपये प्रति महिना होते जे आता 2019 मध्ये कमी होऊन 80 रुपये प्रति महिना झाले आहे.

टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या प्रीपेड प्लॅनच्या दरात वाढ केली आहे. तर पोस्ट पेडचे प्लॅन सादर केलेले नाहीत आणि अनलिमिटेड व्हाइस कॉलिंगची सेवा लिमिटेड केलेली नाही. दोन्ही एअरटेल आणि वोडाफोन-आयडिया या कंपनीचे पोस्टपेड प्लॅन 499 रुपये आहे. पोस्टपेडसाठी अजूनही कोणत्याही प्लॅनचे नवे दर घोषित केले नाहीत. एअरटेलकडून आपल्या यूजर्सला एसएमएस करुन सांगण्यात आले आहे की त्यांच्या प्लॅनमध्ये कोणतेही मोठे बदल केले नाहीत आणि त्यांनी पहिल्या सारख्याच सुविधा मिळतील.

ज्या एअरटेल आणि वोडाफोन-आयडीयाच्या यूजर्सने पहिल्यांदाच प्लॅन रिचार्ज केले आहेत, ते कायम ठेवण्यासाठी यूजर्सला किमान 49 रुपयांचे रिचार्ज करावे लागेल. जिओने देखील ऑल इन वन प्रीपेड प्लॅनमध्ये 40 टक्के वाढ केली आहे. ज्यात यूजर्सला फ्री FUP मिनिट्स ऑफर करण्यात आले आहेत. जे यूजर्स अन्य नेटवर्कवर कॉल करण्यासाठी वापरू शकतात. तसेच यात जिओ टू जिओ कॉलिंग फ्री आहे. लिमिट क्रॉस केल्यानंतर इतर नेटवर्कवर ग्राहकांना 6 पैसे प्रति मिनिट दराने पैसे पडतील.

Visit : Policenama.com