Amazon ची नवी टेक्निक ! आता फक्त हात दाखवून करता येईल पेमेंट, नसेल कार्डाची गरज

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  अमेझॉनकडून आज एक नवीन पाम रिकग्निशन टेक्नॉलॉजी (Palm Recognition technology) सादर केली गेली आहे, ज्याच्या माध्यमातून युजर्स आपला तळहात दाखवून पेमेंट करू शकतात. म्हणजेच तुम्हाला यापुढे पेमेंटसाठी क्रेडिट किंवा डेबिट कार्डची गरज भासणार नाही. या नव्या तंत्रज्ञानाला Amazon One असे नाव देण्यात आले आहे. या टेक्निकमध्ये लांबून हात दाखवून रिटेल स्टोअरमध्ये पैसे दिले जाऊ शकतात. अमेझॉनकडून Palm Recognition Technology वर जवळपास एक वर्ष काम चालू होते. कंपनीने या सेवेच्या पेटंटसाठी अर्ज केला आहे.

कसा करू शकता Amazon One सेवेचा वापर

Amazon One सेवा वापरण्यासाठी अमेझॉन अकाउंट असणे आवश्यक नाही. ग्राहक त्यांच्या फोन नंबर आणि क्रेडिट कार्डच्या मदतीने ही सेवा वापरू शकतात. तसेच यासाठी बायोमेट्रिक डेटा आवश्यक असणार नाही. ग्राहकांना हवे असल्यास ते त्यांचा बायोमेट्रिक डेटा देखील डिलिट करू शकतात. Amazon One तुमचा तळहात एक आयडेंटिटी म्हणून वापरेल. या तंत्रात शिरांचा पॅटर्न तसेच तळहाताचे तपशील आणि रेषांच्या माध्यमातून एक पाम स्वाक्षरी तयार केली जाईल. पाम स्वाक्षरी प्रारंभिक टप्प्यात अमेझॉनच्या Go Store मध्ये वापरली जाईल. तसेच कंपनी येत्या वर्षात Amazon One ला इतर स्टोअरशी जोडेल.

Amazon One सेवेचा होईल विस्तार

कंपनीच्या म्हणण्यानुसार, Amazon One फक्त पाम आधारित पेमेंट्सपुरते मर्यादित असू शकत नाही. अमेझॉनकडून रिटेल स्टोअर व्यतिरिक्त याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जाऊ शकतो. थर्ड पार्टी म्हणून कंपनी Amazon One सर्व्हिस देऊ शकते. अमेझॉनला ऑफिस बिल्डिंग, किरकोळ विक्रेते, स्टेडियममध्ये लावले जाऊ शकते, जेणेकरून अधिकाधिक लोक या सेवेचा आनंद घेऊ शकतील. तसेच सोयीस्कर पेमेंट करू शकतील. अमेझॉनकडे मजबूत रिटेल कनेक्टिव्हिटी आहे, ज्यामुळे कंपनी Palm Scanning तंत्रज्ञानाला प्रत्यक्षात आणू शकते. मात्र अमेझॉनकडून याची पुष्टी केली गेली नाही की, किती किरकोळ विक्रेते, व्हेन्यू आणि व्यवसायात Amazon One चा वापर करतील. पण कंपनीने निश्चितपणे म्हटले आहे की, ते बर्‍याच विश्वासार्ह ग्राहकांशी चर्चेत सहभागी आहेत.