25 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळतायेत 43 इंच स्क्रीन ‘हे’ सर्वोत्कृष्ट Android ‘स्मार्ट TV’, जाणून घ्या

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : गेल्या आठवड्यात भारतीय बाजारात अनेक स्मार्ट टीव्ही लाँच झाल्या आहेत. या स्मार्ट टीव्ही स्वस्त किंमतीच्या श्रेणीसह सादर केल्या गेल्या आहेत. बर्‍याच स्मार्टफोन निर्माता कंपन्या तसेच घरगुती उपकरणे बनवणाऱ्या कंपन्यांनीही भारतीय बाजारात आपला स्मार्ट टीव्ही आणला आहे. या कंपन्यांमध्ये भारतीय ब्रँडचाही समावेश आहे. गेल्या काही दिवसांत वनप्लस, थॉमसन, रिअलमी आणि शिन्को यांनी आपली बजेट स्मार्ट टीव्ही सिरीज सुरू केली आहे. या स्मार्ट टीव्हीपैकी आज आम्ही तुमच्यासाठी 43 इंच स्क्रीन आकाराच्या अँड्रॉइड स्मार्ट टीव्हीबद्दल माहिती घेऊन आलो आहोत, ज्यांची किंमत 25,000 पेक्षा कमी आहे.

शिन्को इंडिया

भारतीय ब्रँड शिन्को इंडियाने गेल्या आठवड्यात आपला 43 इंचाचा 4K स्मार्ट टीव्ही लाँच केला. हा स्मार्ट टीव्ही S43UQLS मॉडेल क्रमांक म्हणून सादर करण्यात आला आहे. या स्मार्ट टीव्हीच्या वैशिष्ट्यांविषयी सांगायचे झाले तर हा अँड्रॉइड 9.0 ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. यात A+ ग्रेड डिस्प्ले पॅनेल आहे जो एचडीआर 10 ला सपोर्ट करतो. स्क्रीन रिझोल्यूशन 3840 x 2160 आहे. यात क्वांटम ल्युमिनाईट तंत्रज्ञान वापरले गेले आहे. साऊंड सिस्टमबद्दल बघितले तर हा डीटीएक्सला सपोर्ट करतो. यामध्ये वापरकर्त्यांना कस्टमाइज्ड UNIWALL UI (यूजर इंटरफेस) मिळेल, ज्यात पूर्व-स्थापित ओटीटी अ‍ॅप्सचा समावेश आहे. या 43 इंचाच्या टीव्हीची किंमत 20,999 रुपये आहे. हा टीव्ही केवळ अ‍ॅमेझॉन इंडियाच्या वेबसाइटवर विक्रीसाठी उपलब्ध आहे.

थॉमसन ओथ प्रो

होम अप्लायन्सेस निर्माता थॉमसनने गेल्या आठवड्यात आपल्या ओथ प्रो 4K स्मार्ट टीव्हीची नवीन रेंज सादर केली. या स्मार्ट टीव्हीमध्ये अल्ट्रा एचडी रिझोल्यूशन 3840 x 2160 आहे. हा स्मार्ट टीव्ही बेझल लेस डिझाइन आणि एचडीआर डिस्प्ले सपोर्टसह लाँच करण्यात आला आहे. त्यात ऑडिओ इन्हांसमेंटसाठी डॉल्वी व्हिजन देण्यात आले आहे. हा स्मार्ट टीव्ही अँड्रॉइड 9.0 ऑपरेटिंग सिस्टमसह आला आहे. त्याच्या रिमोटमध्ये गूगल असिस्टंट, प्राइम व्हिडिओ, नेटफ्लिक्स आणि यूट्यूबसाठी समर्पित बटणे आहेत. याव्यतिरिक्त, त्याचे रिमोट गूगल व्हॉईस असिस्टंट फीचरसह येते. या स्मार्ट टीव्हीच्या 43 इंचाच्या स्क्रीन आकाराच्या मॉडेलची किंमत 24,999 रुपये आहे. हा टीव्ही केवळ फ्लिपकार्टवरून विकत घेतला जाऊ शकतो.

रिअलमी टीव्ही

रिअलमीने गेल्या महिन्यात पहिली परवडणारी स्मार्ट टीव्ही सिरीज सुरू केली. या स्मार्ट टीव्हीच्या 43 इंचाच्या स्क्रीन मॉडेलची किंमत 21,999 रुपये असून ती केवळ फ्लिपकार्टवरून खरेदी केली जाऊ शकते. या स्मार्ट टीव्हीच्या फीचर्स विषयी सांगायचे झाले तर हा फुल एचडी रिझोल्यूशनसह येतो. याच्या डिस्प्लेचा रिझोल्यूशन 1920 x 1080 पिक्सलचा आहे. त्यात मीडियाटेक क्वाड कोअर प्रोसेसर वापरण्यात आला आहे. हा 1 जीबी रॅम आणि 8 जीबी स्टोरेजसह येतो.

वनप्लस टीव्ही वाय सिरीज

वनप्लसने गेल्या आठवड्यातच परवडणारी वाय सिरीज सुरू केली. या स्मार्ट टीव्हीच्या 43 इंचाच्या मॉडेलची किंमत 22,999 रुपये आहे. हा टीव्ही केवळ अ‍ॅमेझॉन इंडिया वेबसाइटवरून खरेदी केला जाऊ शकतो. त्याच्या फीचर्स विषयी सांगायचे झाले तर फुल एचडी डिस्प्ले DCI-P3 कलर गॅमट टेक्नॉलॉजी, ड्युअल 10 डब्ल्यू स्पीकर्स, डॉल्वी ऑडिओसह येतो. हा स्मार्ट टीव्ही अँड्रॉइड 9 वरही चालतो. तेथे बरेच प्री-स्थापित ओटीटी प्लॅटफॉर्म आहेत. इतर अँड्रॉइड स्मार्ट टीव्हीप्रमाणेच हा देखील इनबिल्ट गूगल क्रोमकास्ट फीचरसह येतो.