Apple चा iPhone SE (2020) होणार ‘मेड इन इंडिया’, किंमत देखील होणार खुपच कमी, जाणून घ्या

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : लोकप्रिय टेक कंपनी अ‍ॅपल आपले अफोर्डेबल डिव्हाइस iPhone SE भारतात बनवण्याच्या विचारात आहे. कंपनी लवकरच मेड इन इंडिया iPhone SE 2020 वर काम सुरू करणार आहे. अहवालानुसार, iPhone SE भारतात तयार केल्यास फोन आयात करण्यासाठी कंपनीला 20 टक्के जादा कर भरावा लागणार नाही. यानंतर फोनची किंमत अत्यंत कमी होईल. अपेक्षा आहे की, मेड इन इंडिया iPhone SE 2020 खूप कमी किंमतीसह भारतात उपलब्ध होईल.

एका अहवालात दिलेल्या माहितीनुसार, अ‍ॅपलने चीनमधील आपल्या कंपोनंट सप्लायर कडून iPhone SE 2020 साठी कंपोनंट भारतात पाठवण्यास सांगितले आहे. अ‍ॅपल भारतात आधीपासूनच आयफोनचे जुने व्हर्जन असेम्बल करतो, परंतु सर्व घटक चीनमधून मागविले जातात. दरम्यान, कंपनीने याबाबत अधिकृतपणे कोणतीही माहिती दिलेली नाही. परंतु अहवालानुसार, कंपनी पुढच्या महिन्यात म्हणजे जुलैमध्ये iPhone SE 2020 चे उत्पादन सुरू करू शकते.

अहवालानुसार नवीन आयफोनच्या आयातीवरील 20 टक्के कर टाळण्यासाठी कंपनीने भारतात iPhone SE (2020) तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. अ‍ॅपलच्या तैवान मॅन्युफॅक्चरिंग कॉन्ट्रॅक्ट विस्ट्रॉनने भारतात तयार होणाऱ्या iPhone SE (2020) साठी कंपोनंट रिसिव्ह करण्याची प्रक्रिया सुरू केल्याचे समजते. 2017 मध्ये, अ‍ॅपलने आयात कर टाळण्यासाठी आणि देशातील वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी भारतात आपल्या काही आयफोन मॉडेल्सची निर्मिती करण्यास सुरवात केली. दरम्यान, कंपनीने आतापर्यंत केवळ जुन्या आयफोन मॉडेलची निर्मिती केली आहे.

दरम्यान, अ‍ॅपलने काही काळापूर्वी भारतीय बाजारात आपला अफोर्डेबल iPhone SE बाजारात आणला होता. त्याच्या 64 जीबी मॉडेलची किंमत 42,500 रुपये, तर 128 जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत 47,800 रुपये आहे आणि 256 जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत 58,300 रुपये आहे. अशा परिस्थितीत जर कंपनीने या डिव्हाइसचे उत्पादन भारतात सुरू केले तर आयात कर 20 टक्क्यांनी कमी केल्यानंतर त्याची किंमत आपोआप कमी होईल.