पोलीसनामा ऑनलाइन टीम: सध्याच्या महागाईच्या काळात टीव्ही घेण्यासाठी खूप पैसे मोजावे लागतात. आणि सध्या जर आपण स्वस्तामध्ये टीव्ही खरेदी करणार असाल तर जाणून घ्या या कंपन्यांच्या टीव्ही बद्दल. कारण या कंपन्या तुम्हाला रु 10,000 च्या आत LED टीव्ही देत आहेत. या कंपन्यांच्या टीव्ही आपल्याला सहज बाजारात उपलब्ध आहेत. यामध्ये काय काय फीचर्स मिळणार ते जाणून घेवू.
१) Daiwa
किंमत :- 8,990 रुपये
कंपनीने या टीव्ही ला 24 इंची एचडी एलईडी डिस्प्ले आहे. याशिवाय टीव्ही मध्ये एक एचडीएमआई आणि एक यूएसबी पोर्ट आहे. तसेच 20 व्हॅट चे दोन स्पीकर आहेत.
२) iFFALCON
कीमत :- 8,999 रुपये
iFFALCON या कंपनीच्या टीव्ही मध्ये 32 इंची HD डिस्प्ले दिला आहे. याशिवाय टीव्ही मध्ये एक एचडीएमआई आणि एक यूएसबी पोर्ट आहे.सोबतच दोन स्पीकर दिले आहेत जे डॉल्बी ऑडिओ डीडी प्लस ला सपोर्ट करतात.
३) Micromax
किंमत :- 9,490 रुपये
या कंपनीच्या टीव्ही मध्ये तुम्हाला 19.5 इंची HD डिस्प्ले दिला आहे. याशिवाय टीव्ही मध्ये एक एचडीएमआई आणि एक यूएसबी पोर्ट आहे. या कंपनीने 16 व्हॅट चे दोन स्पीकर दिले आहेत.
४) Pansasonic F200
किंमत: 9799 रु
Panasonic F200 मध्ये 24 इंची डिस्प्ले आहे. जो 1366 x 768 फिक्सल आहे.