अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 1.5 GB डाटाचे ‘हे’ आहेत बेस्ट प्री-पेड प्लॅन, किंमत 250 रुपयांपेक्षा कमी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   Reliance Jio, Airtel Am¡a Vodafone-idea च्या प्रीमियमपासून बजेट रेंजपर्यंतचे हजारो रिचार्ज प्लॅन टेलीकॉम बाजारात उपलब्ध आहेत. याच कारणामुळे ग्राहकांना आपल्यासाठी योग्य रिचार्ज पॅक निवडण्यात संभ्रम होत आहे. अशावेळी जर तुम्ही कमी किमतीचा प्री-पेड प्लॅन शोधत असाल, तर आम्ही तुम्हाला तीन कंपन्यांचे काही शानदार प्लॅन सांगणार आहोत, या सर्व रिचार्ज प्लॅनची किंमत 250 रुपयांपेक्षा कमी आहे आणि यामध्ये तुम्हाला रोज 1.5 जीबी डाटा मिळेल. जाणून घेवूयात हे स्वस्त प्री-पेड प्लॅन…

Jio चा 199 रुपयांचा प्लॅन

जियो यूजर्सना या रिचार्ज प्लॅनमध्ये रोज 1.5जीबी डाटासह 100 एसएमएस मिळतील. सोबतच अन्य नेटवर्कवर कॉलिंग करण्यासाठी 1000 एफयूपी मिनिट देण्यात येतील, मात्र, यूजर्स जियो-टू-जियो नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग करू शकतात. अन्य बेनेफिट्समध्ये कंपनी ग्राहकांना जियो अ‍ॅपचे सबस्क्रीप्शन मोफत देते. या पॅकचा कालावधी 28 दिवसांचा आहे.

Airtel चा 249 रुपयांचा प्लॅन

एयरटेलच्या ग्राहकांना या रिचार्ज प्लॅनमध्ये रोज 1.5जीबी डाटासह 100एसएमएस मिळतील. सोबतच यूजर्स या प्लॅनद्वारे कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग करू शकतात. याशिवाय कंपनी यूजर्सना एयरटेल एक्सट्रीम आणि विंक म्यूझिकचे सबस्क्रीप्शन मोफत देते. याची कालावधी 28 दिवसांचा आहे.

Vodafone ideaचा 249 रुपयांचा प्लॅन

वोडाफोन-आयडियाचा हा रिचार्ज प्लॅन 28 दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये यूजर्सना रोज 1.5जीबी डाटासह 100एसएमएस मिळतील. तसेच कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग करता येते. याशिवाय, एमपीएलमध्ये 125 रुपयांचा बोनस कॅश दिला जाईल. तर झोमॅटोकडून फूड ऑर्डर केल्यास 75 रुपयांचे डिस्काऊंट मिळेल.