8000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत येतात ‘हे’ 5 स्मार्टफोन्स, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तुम्ही स्वत:साठी स्वस्त स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असल्यास, ही बातमी तुमच्यासाठी आहे. आज आपण भारतीय बाजारपेठेत उपस्थित असलेल्या काही उत्तम स्मार्टफोन्सबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांची किंमत ८,००० रुपयांपेक्षा कमी आहे. या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला एचडी डिस्प्ले आणि उत्कृष्ट कॅमेरा मिळेल. चला तर मग जाणून घेऊया या उत्कृष्ट स्मार्टफोन्सबद्दल…

Lava Z66
लावाने लावा झेड६६ स्मार्टफोन बॉयकॉट चीन अभियानाअंतर्गत बाजारात आणला आहे. या स्मार्टफोन ३ जीबी रॅम + ३२ जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत ७,८९९ रुपये आहे. या स्मार्टफोनमध्ये ६.०८ इंच एचडी डिस्प्ले, ऑक्टा-कोर युनिसोक प्रोसेसर आणि ३,९५० एमएएच बॅटरी आहे. या व्यतिरिक्त या स्मार्टफोनला ड्युअल कॅमेरा सेटअपचा सपोर्ट आहे, ज्यामध्ये १३ एमपी प्राइमरी सेन्सर आणि ५ एमपी सेन्सर आहे. तसेच यात १३ एमपीचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

Redmi 8a
रेडमी ८ए शाओमीच्या उत्कृष्ट स्मार्टफोनपैकी एक आहे. या स्मार्टफोनच्या २ जीबी रॅम + ३२ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ६,९९९ रुपये आहे. या स्मार्टफोनमध्ये ६.२२ इंचाचा एचडी डिस्प्ले आहे, ज्याचा रिझोल्यूशन ७२०×१५२० पिक्सल आहे. तसेच या स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन ४३९ चिपसेट आहे. याशिवाय यात १२ एमपी रियर आणि ८ एमपी फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये ५ हजार एमएएच बॅटरी देण्यात आली आहे.

Realme C2
रिअलमी सी२ हा रिअलमीचा सर्वाधिक विकल्या जाणार्‍या स्मार्टफोनपैकी एक आहे. या स्मार्टफोनच्या २ जीबी रॅम + १६ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ६,४९९ रुपये आहे. या स्मार्टफोनमध्ये ६.१ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले आहे, ज्याचा आस्पेक्ट रेशो १९.५:९ आहे. तसेच स्क्रीन सेफ्टीसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास दिला गेला आहे. तसेच या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक हेलिओ पी२२ प्रोसेसर आणि ४ हजार एमएएच बॅटरीची सुविधा आहे. या स्मार्टफोनमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये पहिला १३ एमपी सेन्सर आणि दुसरा २ एमपी सेन्सर आहे. याशिवाय ५ एमपीचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

Moto E6s
जर तुम्हाला कमी किंमतीचा स्मार्टफोन खरेदी करायचा असेल, तर तुम्ही मोटो ई६एस निवडू शकता. या स्मार्टफोनच्या ४ जीबी रॅम आणि + ६४ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ७,९९९ रुपये आहे. या स्मार्टफोनमध्ये ६.१ इंचाचा डिस्प्ले, मीडियाटेक हेलिओ पी२२ प्रोसेसर, १३ एमपी + २ एमपी कॅमेरा सेटअप, ८ एमपीचा सेल्फी कॅमेरा आणि ३ हजार एमएएच बॅटरी आहे.

Samsung M01 core
सॅमसंग एम०१ कोअरच्या २ जीबी रॅम + ३२ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ७,८७७ रुपये आहे. या स्मार्टफोनमध्ये ५.३ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले आहे. याशिवाय या स्मार्टफोनला मीडियाटेक एमटी६७३९डब्लूडब्लू प्रोसेसर, ८ एमपी रियर कॅमेरा, ५ एमपी सेल्फी कॅमेरा आणि ३ हजार एमएएच बॅटरीचा सपोर्ट आहे.