‘या’ कंपनीच्या 65 रूपयांच्या स्मार्ट रिचार्जवर मिळणार 130 रूपयाचा टॉकटाईम, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय दूरसंचार कंपनी एअरटेलने आपल्या ग्राहकांसाठी खास 65 रुपयांचे नवीन रिचार्ज आणले आहे. यामध्ये डबल टॉकटाईम मिळणार आहे. मागील वर्षी कंपनीने विविध स्मार्ट प्लॅन लाँच केले होते. त्यानंतर आता हा डबल टॉकटाईम देणारा स्मार्ट रिचार्ज बाजारात आणले आहे. मात्र हा प्लॅन फक्त काही सर्कलसाठीच असून लवकरच इतर सर्कलमध्ये देखील हा प्लॅन उपलब्ध करून दिला जाणार आहे.

Airtel 65 या प्लॅनची वैशीष्ट्ये
या प्लॅनमध्ये तुम्हाला 130 रुपयांचा टॉकटाईम मिळणार असून 200MB डेटा देखील मिळणार आहे. तसेच 60 पैसे प्रति मिनट च्या दराने कॉलिंग सुविधा देखील मिळणार आहे. याची व्हॅलिडिटी हि 28 दिवसांची असणार आहे. हा प्लॅन आसाम, बिहार, झारखंड, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू-कश्मीर, मध्य प्रदेश आणि छत्तीसगढ नॉर्थ ईस्ट, राजस्थान, यूपी ईस्ट, यूपी वेस्ट, उत्तराखंड आणि पश्चिम बंगालमध्ये नवीन फायद्यांसह उपलब्ध आहे. तर आंध्र प्रदेश, तेलंगाना, कोलकाता, दिल्ली एनसीआर, चेन्नई, मुंबईमध्ये जुन्याच फायद्यांसह हा प्लॅन दिला जणार आहे.

Airtel चे अन्य स्मार्ट रिचार्ज
या प्लॅन व्यतिरिक्त कंपनी विविध प्लॅन ग्राहकांना देत असून यामध्ये 245 रुपयांचा प्लॅन देखील आहे. यामध्ये ग्राहकांना 2 GB डेटा मिळत असून 245 रुपये टॉकटाईम देखील मिळणार आहे. 145 रुपयांचा देखील प्लॅन मिळणार आहे. 35 रुपयांचा बेसिक प्लॅन देखील उपलब्ध असून यामध्ये ग्राहकांना 26 रुपये टॉकटाईम मिळणार आहे.