‘Jio Fiber’ला BSNL च्या ‘Bharat Fiber’ची ‘टक्कर’, ‘हे’ आहेत ‘हायस्पीड’ प्लॅन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Jio Fiber बाजारात येणार असून इंटरनेट सुविधा देणाऱ्या अनेक कंपन्यांनी सावधगिरी बळगून आपल्या ब्रॉडबॅन्ड प्लॅनमध्ये बदल करण्याचा किंवा नवा आणि स्वस्त प्लॅन लॉन्च करण्याची तयारी सुरु केली आहे. याचमुळे BSNL ने देखील आपल्या नव्या फायबर नेटवर्क ब्रॉडबॅन्ड सेवा Bharat Fiber या प्लॅनमध्ये रिवाइस केले असून त्यात बदल केले आहेत. BSNL ने २ प्लॅन लॉन्च केले आहेत आणि प्लॅनच्या किंमतीत बदल केले आहेत.

८४९ रुपयात ६०० जीबी डाटा –

पहिल्यांदा प्लॅनची किंमत ७७७ रुपये ठेवण्यात आली होती. आता या प्लॅनमध्ये ५०० जीबी प्रति महिना ऑफर देण्यात आली आहे पंरतू आता बदल करण्यात आल्यानंतर ६०० जीबी डाटा प्रति महिना देण्यात येणार आहे. असे असले तरी मासिक दरात वाढ करण्यात आली असून ८४९ रुपये प्रति महिना करण्यात आली आहे. याबरोबर ५० Mbps चा स्पीड देण्यात येईल. मात्र डाटा संपल्यानंतर मात्र हा स्पीड २ Mbps असेल. एवढेच नाही तर यात ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंगचा लाभ घेता येईल.

४९९९ रुपयांचा प्लॅन –

BSNL च्या दुसऱ्या प्लॅनमध्ये आता ५० जीबी डाटा देण्यात येत होता मात्र आता बदल केल्यानंतर मात्र हा डाटा वाढवला असून ५५ जीबी करण्यात आला आहे. यात १०० Mbps चा डाटा स्पीड देण्यात येणार आहे. डाटाची सीमा संपल्यावर ही स्पीड ४ Mbps करण्यात येईल. या प्लॅनची किंमत वाढून ती ३९९९ वरून ४९९९ करण्यात आली आहे. यात देखील ग्राहकाला अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देण्यात आली आहे.

सिनेजगत

Video : अभिनेत्री उर्वशी रौतेलासोबत ‘बोल्ड’ सीन करताना ‘हा’ अभिनेता ‘आऊट ऑफ कंट्रोल’ !

Photo : अभिनेत्री जया प्रदा यांनी यापुर्वी देखील सहन केल्या आहेत ‘तशा’ टिका, पहा फोटो

Video : चित्रपटाच्या सेटवर ‘ढसा-ढसा’ रडला कार्तिक आर्यन

बहुजननामा

आगामी विधानसभेसाठी वंचित-काँग्रेस एकत्र आल्यास समीकरणे बदलतील

शहरातील सर्व बांधकामे तातडीने थांबवा – बाबा आढाव

आधी एक भुमिका आणि खासदार झाल्यावर एक, इम्तियाज जलीलजी, हे वागणंं बरंं न्हवं !