BSNL नं ग्राहकांना दिलं ‘गिफ्ट’, 96 रूपयाच्या प्लॅनची ‘वैधता’ आणखी वाढणार
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – BSNL ने आपला 96 रुपयांचा लोकप्रिय प्लॅन Vasantham Gold ची वैधतेला 90 दिवसांनी वाढवली आहे. आता यूजर्स या प्लॅनचा लाभ 30 जून 2020 पर्यंत घेऊ शकतात. ही प्लॅन सध्या फक्त चेन्नई आणि तमिळनाडू या दोन राज्यात उपलब्ध आहे. हा कंपनीचा एक प्रोफेशनल प्लॅन आहे आणि कंपनीच्या नव्या यूजर्ससाठी उपलब्ध आहे. BSNL च्या जुन्या यूजर्सला या प्लॅनचा लाभ घेता येणार नाही. कंपनीने 96 रुपयांची वैधता देखील वाढवली आहे आणि काही अन्य बेनिफिट्स देखील दिले आहेत.
BSNL च्या वेबसाइटनुसार Vasantham Gold ची प्लॅन वैधता 90 दिवसांसाठी वाढवण्यात आली आहे आणि आता यूजर्स 30 जून 2020 पर्यंत या प्लॅनचा लाभ घेऊ शकतात. प्लॅनची किंमत 96 रुपये आहे यात यूजर्सला प्रतिदिन 250 मिनिट व्हाइस कॉलिंग मिळेल, ज्यात लोकल आणि एसटीडी कॉल्सचा समावेश आहे. याद्वारे यूजर्स कोणत्याही नेटवर्कवर कॉल करु शकतात. याशिवाय यात 100 एसएमएस प्रतिदिन मिळतील.
या प्लॅन पुढे चालू ठेवण्यासाठी ‘PLAN CONTINUE’ लिहून 123 वर मेसेज पाठवावा लागेल. प्लॅनच्या वैधतेसह यूजर्सला 21 दिवसांचे बेनेफिट्स देखील दिले जातील. या बेनिफिट्समध्ये व्हाइस कॉलिंग मिनिट आणि एसएमएस मिळतील. पहिल्यांदा यात कॉलिंग आणि एमएमएसचे 28 दिवसांपर्यंत बेनिफिट्स मिळत होते परंतु आता ते कमी करुन 21 दिवसांचे केले आहे.
BSNL ने आपल्या प्रीपेड यूजर्ससाठी दोन नवे डाटा प्लॅन सादर केले आहेत ज्यात 693 रुपये आणि 1212 रुपयांचा प्लॅन सहभागी आहे. परंतु प्लॅनचा लाभ आंध्रप्रदेश आणि तेलंगाणाचे यूजर्स घेऊ शकतील. या यूजर्सला 300GB आणि 500GB डाटा सुविधा मिळत आहे. लॉकडाऊन दरम्यान घरुन काम करणाऱ्या यूजर्सला फायदेशीर सुविधा मिळेल.