BSNL नं ग्राहकांना दिली 5GB डेटाची ‘ऑफर’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सार्वजनिक क्षेत्रातील दूरसंचार कंपनी बीएसएनएलने गेल्या महिन्यात ‘वर्क फ्रॉम होम’ इंटरनेट प्लॅन सुरू केला असून यात एका महिन्यासाठी ५ जीबी इंटरनेट डेटा दिला जात आहे. कंपनीने सध्याचा लॉकडाऊन पाहता या योजनेची वैधता १ मे पर्यंत वाढवली असून आता युजर्स या ऑफरचा फायदा १९ मे पर्यंत घेऊ शकतील. कंपनीच्या तमिळनाडू टेलिकॉम सर्कलने याबाबतची माहिती ट्विटवरून दिली आहे. आता युजर्सना १९ मे पर्यंत या प्रमोशनल ऑफरचा लाभ घेता येणार आहे. या योजनेत युजर्सना १० एमबीपीएस वेगाने ५ जीबी डेटा देण्यात आला आहे.

जरी युजरने हा प्रतिदिन ५ जीबी डेटा वापरला तरीही त्याला कमी वेगाने मोफत अमर्यादित इंटरनेट मिळत राहील. बीएसएनएलची ही योजना ब्रॉडबँड आणि लँडलाईन वापरकर्त्यांसाठी उपलब्ध असून ही योजना देशातील सर्व टेलिकॉम सर्कलसाठी उपलब्ध आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी वापरकर्त्यांना कोणत्याही प्रकारचे सिक्युरिटी डिपॉजिट जमा करण्याची आवश्यकता नाही. कंपनीचा टोल फ्री क्रमांक १८००-३४५-१५०४ वर कॉल करून वापरकर्ते या योजनेचा लाभ घेऊ शकतात. ही ऑफर सध्याच्या वापरकर्त्यांसाठी आहे.

बीएसएनएलने आपल्या सर्व प्रीपेड वापरकर्त्यांना कोरोना व्हायरस लॉकडाऊनमध्ये दिलासा देत या योजनेची वैधता ५ मे पर्यंत वाढवली आहे. २४ मार्चपासून जाहीर झालेल्या पहिल्या लॉकडाऊनमध्येही कंपनीने २० एप्रिलपर्यंत वापरकर्त्यांना १० रुपये मोफत इनकमिंग कॉल आणि टॉकटाईम देखील ऑफर केले होते.