फायद्याची गोष्ट ! BSNL घेवून आलंय कमी किंमतीचे भन्नाट प्रीपेड प्लॅन, मिळणार कॉलिंग आणि डेटाची सुविधा, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलने मागील काही दिवसांपूर्वी एक लाँग टर्म वर्क फ्रॉम होम प्लान सादर केला होता. 2,399 रुपयांच्या या प्लानचा वापर यूजर्स 600 दिवसांपर्यंत करू शकतात आणि आतापर्यंतचा सर्वात जास्त वॅलिडिटीचा प्लान आहे. तर आता कंपनीने एकसोबत दोन नवीन प्रीपेड प्लॅन बाजारात आणले आहेत. त्यांची किंमत 94 रूपये आणि 95 रूपये आहे. कमी किमतीच्या प्लानमध्ये यूजर्सला डाटा आणि कॉलिंग दोन्ही सुविधा मिळतील.

बीएसएनएलचा 95 रुपये वाला प्लान

95 रुपयांच्या प्लानची वॅलिडिटी 90 दिवसांची आहे आणि यूजर्स यामध्ये 3जीबी डाटाचा लाभ घेऊ शकतो. डाटाशिवाय या प्लानमध्ये 100 मिनिट कॉलिंगसाठी सुद्धा मिळतील. सोबतच रोमिंगची सुद्धा सुविधा दिली जात आहे. या प्लानमध्ये 100 मिनिट संपताच यूजर्सला लोकल कॉलसाठी 0.02 प्रति सेकंद आणि एसटीडी कॉलसाठी 0.24 रुपये प्रति सेकंदचा चार्ज द्यावा लागेल.

बीएसएनएलचा 94 रुपये वाला प्लान

94 रुपयांच्या प्लानमध्ये सुद्धा यूजर्सला 100 मिनिट कॉलिंगसाठी मिळतील. हे संपताच लोकल कॉलसाठी एक रुपये प्रति मिनट आणि एसटीडी कॉलसाठी 1.3 रुपया प्रति मिनट च्या दराने चार्ज द्यावा लागेल. हा प्लान सुद्धा 90 दिवसांच्या वॅलिडीटीसोबत येतो आणि यामध्ये सुदा यजर्स 3जीबी डाटाची सुविधा दिली जात आहे.

बीएसएनएलच्या 95 रुपये आणि 94 रुपयांच्या प्लानसोबत यूजर्सना 60 दिवसांसाठी फ्री कॉलर ट्यूनची सुविधा सुद्धा मिळते. सामान्यपणे कॉलर ट्यूनसाठी यूजर्सला प्रति महिना 30 रूपये चार्ज आकारला जातो.

बीएसएनएलचा 2,399 रुपयांचा प्लान

बीएसएनएलने मागील काही दिवसांपूर्वी 2,399 रुपयांचा लाँग टर्म प्लान सादर केला होता. या प्लानची वॅलिडीटी 600 दिवसांची आहे आणि याच्या वॅलिडीटी दरम्यान यूजर्स 250 मिनिटच्या डेली लिमिटसोबत कॉलिंगचा लाभ घेऊ शकतो. हा कंपनीचा एक कॉलिंग प्लान आहे आणि यामध्ये कोणत्याही प्रकारचा डाटा नाही.