BSNL ची प्रमोशन ऑफर झाली रिलाँच, ग्राहकांना होईल मोठा फायदा, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   सरकारी टेलिकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) ने आपल्या सध्याच्या प्रमोशन ऑफरचा विस्तार केला आहे. या ऑफरमध्ये यूजरला प्रत्येक रविवारी 100 रुपयांच्या टॉपअपवर फुल टॉकटाइम मिळेल. बीएसएनएलकडून अनेक टॉपअपवर रेग्युलर ऑफर दिल्या जातात; परंतु 100 रुपयांच्या टॉपअपला प्रमोशनल ऑफर अंतर्गत सादर करण्यात आले आहे, जिथे विेशेषता रविवारी रिचार्जवर फुल टॉकटाइम दिला जात आहे. ओन्ली टेकच्या रिपोर्टमध्ये ही माहिती दिली आहे.

31 मार्च 2021 पर्यंत प्रमोशनल ऑफरचा लाभ

बीएसएनएलच्या तामिळनाडू सर्कलनुसार, बीएसएनएलच्या प्रमोशनल ऑफरची पुन्हा 90 दिवसांसाठी एंट्री झाली आहे. ही ऑफर जीएसएम प्रीपेड मोबाइल सर्व्हिसअंतर्गत सादर केली आहे, जिची सुरुवात 29 नोव्हेंबर 2020 ला झाली आहे आणि 31 मार्च 2021 पर्यंत जारी राहील. अशावेळी ग्राहक 31 मार्च 2021 पर्यंत प्रत्येक रविवारी 100 रुपयांच्या टॉपअपवर फुल टॉक टाइमचा लाभ घेऊ शकतात. हे फिजिकल पेपर व्हाउचर, सी-टॉपअप, ई-वॉलेट आणि वेब पोर्टलवर उपलब्ध आहे.

बीएसएनएलकडून ही पहिली प्रमोशन ऑफर 22 ऑगस्ट 2020 ला 90 दिवसांच्या कालावधीसाठी सादर करण्यात आली होती. तीसुद्धा जीएसएम प्रीपेड मोबाइल सर्व्हिस अंतर्गत 18 नोव्हेंबर 2020 पर्यंत उपलब्ध करण्यात आली होती. हाच प्लॅन कंपनीने पुन्हा नोव्हेंबरच्या अखेरीस रिलाँच केला आहे.

फ्री सिमची प्रमोशनल ऑफर

बीएसएनएलने नुकतीच यूजरला फ्री सिम कार्ड देण्याची प्रमोशनल ऑफर सुरू केली होती. जिची अंतिम तारीख 28 नोव्हेंबर 2020 होती. या ऑफरमध्ये यूजरला मोफत सिम कार्ड दिले जात होते. परंतु तिच्या काही अटी आहेत, ज्यासाठी यूजरला पहिले रिचार्ज किमान 100 रुपयांचे करावे लागते. अजूनपर्यंत यूजरला फ्री सिम कार्डसाठी 20 रुपये द्यावे लागत होते.