खुशखबर ! Jio पेक्षा 6 पट जास्त डेटा देणार BSNL, जाणून घ्या ‘प्लॅन’

नवीदिल्ली : वृत्तसंस्था – सध्या कॉल आणि इंटरनेट डेटासाठी सिमकार्ड कंपन्या अनेक नवीन नवीन ऑफर देत आहेत. मात्र Jio ने बाजारात अशा काही ऑफर मांडल्या की बाकी कंपन्यांना त्यांच्याप्रमाणे रेट करावे लागले. मात्र आता BSNL कंपनीने ग्राहकांसाठी मोठा प्रीपेड प्लॅन बनवला आहे.

BSNL ने आपल्या Rs १,०९८ च्या प्लॅन मध्ये बदल केला आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना आधी ८४ दिवसांची व्हॅलिडिटी मिळत असे त्याचबरोबर अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग सोबत डेटा ही दिला जात होता. आता प्लॅन मध्ये बदल करण्यात आला आहे. आता या प्लॅनची व्हॅलिडिटी ७५ दिवसांची करण्यात आली आहे. आणि ग्राहकांना ३७५ GB डाटा बिना कोणत्याही FUP लिमिट शिवाय मिळणार आहे.

BSNL चा हा प्लॅन दिल्ली आणि मुंबई टेलिकॉम सर्कल व्यतिरिक्त देशातील इतर सर्व टेलिकॉम सर्कलमध्ये व्हॅलिड असणार आहे. तसेच प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग आणि प्रति दिन १०० एस एम एस देण्यात आलेले आहेत. विशेष म्हणजे डेटा वापरण्याबाबत यामध्ये कोणतेही बंधन टाकण्यात आलेले नाही. म्हणजेच ७५ दिवसांमध्ये कधीही संपेपर्यंत याचा डेटा वापरता येणार आहे.

BSNL च्या या प्लॅनची Jio च्या Rs ९९९ प्लॅनशी तुलना केली जात आहे. कारण jio च्या प्लॅनमध्ये ग्राहकाला ६० जीबी डेटा मिळतो आणि BSNL द्वारे मिळणाऱ्या प्लॅनमध्ये मिळणार डेटा Jio पेक्षा सहा पट जास्त आहे.

आरोग्यविषयक वृत्त –