Dish TV च्या ग्राहकांसाठी खुशखबर ! आता ‘रिचार्ज’ केल्यानंतर ‘पेमेंट’ करा ‘निवांत’

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –   लॉकडाऊन दरम्यान, घरात बसलेले लोक टीव्ही आणि इंटरनेटवर आपला वेळ घालवत आहेत. अशावेळी लोकांना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून दूरसंचार कंपन्या आणि डीटीएच ऑपरेटर ग्राहकांना चांगल्या सुविधा देत आहेत. ग्राहकांना टीव्ही पाहण्यात कोणतीही अडचण येऊ नये म्हणून डिश टीव्हीने आपल्या ग्राहकांसाठी पे लेटर सेवा सुरू केली आहे. या सेवेमध्ये सबस्क्रिप्शन डिअॅक्टिवेट झाल्यानंतरही ग्राहक कोणत्याही व्यत्ययाशिवाय टीव्ही पाहू शकणार आहे.

डिश टीव्हीने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर एक पोस्ट शेअर करुन Pay Later सेवेबद्दल माहिती देऊन सांगितले की, ‘लोकांच्या घरात राहण्याच्या प्रयत्नाचे आम्ही कौतुक करतो. यासह, कंपनीने म्हटले आहे की, या कठीण काळात लोकांना कोणतीही अडचण येऊ नये म्हणूनच पे लेटर सेवा सुरू केली गेली आहे. ही सेवा सक्रिय करण्यासाठी, आपल्याला फक्त आपल्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवरून 1800-274-9050 वर एक मिस कॉल देणे आवश्यक आहे.

ही सेवा त्या लोकांसाठी खूप फायदेशीर ठरेल ज्यांची सब्सक्रिप्शन लॉकडाऊन दरम्यान कालबाह्य होणार आहे आणि ते रीचार्ज करण्यास सक्षम नाहीत. अशा परिस्थितीत आपण पे लेटर सेवा वापरुन आपला सेट अप बॉक्स रिचार्ज करू शकता आणि नंतर पैसे देऊ शकता. म्हणजेच एका मिसकॉलने आपल्या सेटअप बॉक्सचे सब्सक्रिप्शन एक्सटेंड होईल.

डिश टीव्ही ही एकमेव कंपनी नाही जिने युजर्सला ही सेवा दिली आहे. यापूर्वी, डिश टीव्हीची प्रतिस्पर्धक कंपनी टाटा स्कायने देखील आपल्या युजर्ससाठी आपत्कालीन क्रेडिट सेवा सुरू केली होती. ही सेवा अशा युजर्ससाठी सुरू केली गेली आहे ज्यांचे सेटअप रीचार्ज केलेले नाही. कंपनी अशा युजर्सला क्रेडिट देत आहे ज्यात ते रिचार्ज केल्यानंतर पेमेंट करू शकतात.