… म्हणून Facebook ला होवू शकतो तब्बल 37 लाख कोटीचा दंड, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकला 37 लाख कोटी रुपयांचा दंड भरावा लागू शकतो. कंपनीला दंड भरण्याचे कारण फेसबुकची सहाय्यक कंपनी इन्स्टाग्राम आहे. दरम्यान, इंस्टाग्रामवर वापरकर्त्याच्या परवानगीशिवाय बायोमेट्रिक डेटा गोळा करण्याचा आरोप आहे. त्याच्याविरूद्ध कॅलिफोर्नियातील रेडवुड सिटीच्या राज्य न्यायालयात खटला दाखल करण्यात आला आहे.

10 कोटी लोकांचा डेटा गोळा केल्याचा आरोप

मिळालेल्या माहितीनुसार फेसबुकवरील आरोप खरे ठरल्यास कंपनीला 37 लाख कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे. इन्स्टाग्रामवर फोटो टॅगिंग टूलचा वापर करून लोगोची फेशिअल रिकग्निशनद्वारे ओळख करण्यात आली असल्याचा आरोप आहे. इन्स्टाग्रामद्वारे हे मान्य केले गेले आहे की, त्याच्या व्यासपीठावर फेशियल रिकग्निशन फीचर अस्तित्त्वात आहे. दरम्यान, इंस्टाग्रामकडून आपल्या सेवा स्थितीत म्हटले आहे की, हे वैशिष्ट्य वापरण्यासाठी वापरकर्त्याला फिचर टर्न ऑन करावे लागेल. कंपनीने म्हटले की, देशाच्या कायद्यानुसार डेटाच्या विशेष संरक्षणासाठी फेस रिकग्निशन टेम्पलेट तयार केले गेले आहे. कंपनीच्या डेटा पॉलिसीचा असा विचार आहे की जर ही फेस रिकग्निशन टेक्नोलोजी इन्स्टाग्रामवर वापरली गेली तर या परिस्थितीत संबंधित व्यक्तीकडून परवानगी घेतली जाईल. परंतु कोर्टात दाखल करण्यात आलेल्या खटल्यात म्हटले आहे की, इन्स्टाग्राम ऑटोमॅटिक फेस रिकग्निशन फिचरचा वापर करते. तसेच, ज्यांच्याकडे इन्स्टाग्राम अकाउंट नाही त्यांच्यासाठी कंपनी त्यांच्या फेशियल रिकग्निशनने डेटा गोळा करते, जी पूर्णपणे कायद्याचे उल्लंघन आहे. कोर्टात दाखल केलेल्या याचिकेत असे म्हटले आहे की, वापरकर्त्यांची परवानगी न घेता इंस्टाग्रामद्वारे सुमारे 10 कोटी लोकांचा डेटा गोळा केला गेला आहे.

यापूर्वीही फेसबुकला भरावा लागला होता दंड

माहितीनुसार, फेसबुकच्या प्रवक्त्याने असे आरोप निराधार असल्याचे सांगितले. ते म्हणाले की इन्स्टाग्रामला फेसबुकद्वारे फेस रिकग्निशन सर्व्हिस दिली जाते. परंतु कंपनी ती वापरत नाही. दरम्यान, फेस रिकग्निशन वापरावरुन फेसबुकवर प्रथमच खटला दाखल झाला नाही. गेल्या महिन्यातही सोशल नेटवर्किंग कंपनीला चुकीच्या पद्धतीने लोकांचा डेटा एकत्रित करण्यासाठी अमेरिकेत 650 दशलक्ष दंड भरावा लागला होता.