Facebook Messenger वर युजर्स आता करू शकतील स्क्रीन शेअर, जाणून घ्या संपुर्ण प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Facebook ने Messenger अ‍ॅपच्या विस्ताराची घोषणा केली आहे. याअंतर्गत आता मेसेंजरमध्ये स्क्रीन शेअरिंगचा पर्याय देण्यात येईल. हा पर्याय अँड्रॉइड आणि आयओएस दोन्ही युजर्ससाठी असेल. मात्र हा स्क्रीन शेअरिंगचा पर्याय वेब व्हर्जनसाठी मर्यादित असेल. तसेच मेसेंजर अ‍ॅपवरही व्हिडिओ कॉलिंग दरम्यान युजर्स त्यांची स्क्रीन शेअर करू शकतील. स्क्रीन शेअरिंगचा पर्याय वन ऑन वन कॉलिंगसाठी असेल. तसेच ग्रुप व्हिडिओ कॉलिंगमध्ये त्याचा वापर करता येईल. या फीचर्सच्या मदतीने युजर्स फोटो गॅलरी, ऑनलाइन शॉपिंग आणि सोशल मीडियासाठी स्क्रीन शेअर करू शकतील. लॉकडाऊनमुळे व्हिडीओ कॉलिंगची मागणी वाढली आहे, ज्यामुळे मेसेंजरवर स्क्रीन शेअरचा पर्याय देण्यात आला आहे.

हे कसे काम करणार?

युजरला मेसेंजर अ‍ॅप उघडून व्हिडिओ कॉल सुरू करावा लागेल. यानंतर स्क्रीनचा बॉटम टॅब ओढावा लागेल, जिथे Share your screen असा पर्याय दिसेल. Share your screen पर्याय निवडल्यानंतर युजरची फोन स्क्रीन अन्य लोकांना दिसेल.

अँड्रॉइड आणि आयओएस आधारित Messenger Rooms १६ लोकांपर्यंतच्या व्हिडिओ कॉलिंगसाठी स्क्रीन शेअर पर्यायाचे सपोर्ट देते. फेसबुकने नवीन व्हिडिओ कॉलिंग फिचर म्हणून Messenger Room लाँच केले होते, जे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ऍप Zoom आणि Skype प्रमाणेच होते. हे एकावेळी ५० लोकांच्या व्हिडिओ कॉलिंगला सपोर्ट करते. फेसबुक खात्यातूनही व्हिडिओ कॉलिंग जोडले जाऊ शकते. Facebook Messenger Room ची स्क्रीन शेअरिंगची मर्यादा १६ लोकांवरून ५० लोकांपर्यंत वाढवायची आहे. तसेच कोण स्क्रीन शेअर करू शकते, निर्मात्याला ते नियंत्रित करण्याचाही पर्याय उपलब्ध करू शकतात. निर्माता स्क्रीन शेअर करण्याचा पर्याय स्वतःपर्यंत मर्यादित ठेवू शकतो किंवा ग्रुपच्या उर्वरित लोकांना शेअर करू शकतो.