Google Meet मध्ये जोडले कमालीचे नवीन फिचर, व्हिडिओ कॉलिंगदरम्यान बॅकग्राउंडच्या आवाजातून मिळेल मुक्ती

नवी दिल्लीः वृत्तसंस्था – दिग्गज टेक कंपनी Google ने घरुन काम करणाऱ्या युजर्सच्या सुविधेसाठी आपल्या कॉलिंग प्लॅटफॉर्म Google Meet मध्ये नवीन फिचर जोडले आहे. ज्याचे नाव न्वाइज कॅन्सिलेशन आहे. या फिचरद्वारे व्हिडिओ कॉल दरम्यान बॅकग्राउंडमध्ये येणाऱ्या आवाजाला थांबवण्यासाठी Android आणि iOS दोन्ही युजर्स सक्षम असतील. कंपनीने जूनमध्ये या फिचरला डेस्कटॉप वर्जनसाठी जारी केले आहे.

गूगलच्या अधिकृत ब्लॉगनुसार, G Suite टीमचे म्हणणे आहे की, गूगल मीटचे नवीन न्वाइज कॅन्सिलेशन फिचर आर्टिफिशियल इटेलिजेंस टेकनिकवर आधारित आहे. युजर्स या फिचरद्वारे व्हिडिओ कॉल दरम्यान बॅकग्राउंडमध्ये पाळीव प्राणी आणि आजुबाजुचा येणाऱ्या आवाजाला रोखू शकतील. हे फिचर G Suite बेसिक, G सूट फॉर नॉन-प्रॉफिट कस्टमर्स आणि G सूट फॉर एज्युकेशनसाठी उपलब्ध नाही.

असा करा फिचरचा उपयोग
ही सुविधा डिफॉल्ड रुपाने बंद आहे. याला ॲक्टिव्ह करण्यासाठी तुम्हाला सेटिंग्समध्ये दिलेल्या More टॅपवर क्लिक करावे लागेल. ज्यानंतर Noise Cancellation फिचर सुरु होईल.

गूगलने मुलांच्या शिक्षणाला अधिक सुविधाजनक बनवण्यासाठी ‘The Anywhere School’ नावाचा नवीन उपक्रम सुरु केला होता. यामध्ये युजर्सला एक किंवा दोन नाही तर 50 नवीन फिचर्सची सुविधा मिळणार आहे. युजर्स याचा लाभ Meet, Classroom, G Suite आणि Google च्या अन्य प्लॅटफॉर्मवर घेऊ शकतात. कंपनीनुसार, जगात मागील काही महिन्यांपासून शिक्षण समुदायाने विद्यार्थ्यांना शिकणे आणि त्यांना पाठबळ देण्याची वचनबद्धतेमध्ये कधीही सूट दिलेली नाही. परंतु गुगलने अशा टूलवर काम केले आहे जे शिक्षक, शाळेतील लीडर्स, कुटूंब आणि विशेषत: ज्या विद्यार्थ्यांना घरी असताना बर्‍याच नवीन गोष्टी शिकण्याची इच्छा असते त्यांचा भार हलका केला आहे.

Google नवीन नियंत्रणांना देखील जारी करणार आहे जेणेकरुन युजर्स सर्व सहभागींसाठी प्रथम, शेवटच्या बैठकीत सामील होण्याची, इन-मीटिंग चॅट अक्षम करणे आणि बरेच काही निवडू शकतील. ऑक्टोबरमध्ये, Google काही अतिरिक्त गोपनीयता प्रदान करण्यासाठी मीट कस्टम लाँच करेल.