Google चा दिवाळीपुर्वीच 5G स्मार्टफोन लॉन्च, अ‍ॅपलला देणार ‘टक्कर’, जाणून घ्या ‘फिचर’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Google Pixel 4 आणि Pixel 4 XL स्मार्टफोन न्यूयॉर्क मध्ये 15 ऑक्टोबरला आयोजित इव्हेंटमध्ये लॉन्च करण्यात येईल. याबरोबर कंपनी आपला पहिला 5 जी पिक्सल फोन लॉन्च करु शकते. कंपनी 5 जी कॉम्पिटीशन मध्ये उतरुन स्पर्धा वाढवू इच्छित आहे. याशिवाय कंपनीचा अ‍ॅपलला टक्कर देण्याचा प्रयत्न आहे. अ‍ॅप्पलचे 5 जी मॉडेल 2020 साली लॉन्च केले जाऊ शकते. Google Pixel 4 XL 5G च्या टॉप लाइन स्पेसिफिकेशन्स बरोबर लॉन्च करण्याची शक्यता आहे. यात 8 जीबी रॅम देण्यात आली आहे.

Google Pixel 4 XL 5G
या फोनमध्ये गुगल 5 जी ऑक्टॉ-कोअर स्नॅपड्रॅगन 855 प्रोसेसर असणार आहे. Geekbench लिटिंगने हे स्पष्ट होते की या फोनमध्ये 8 जीबी रॅम देण्यात येईल अशी शक्यता आहे. कंपनी आपल्या 5 जी मॉडेलला आपल्या हार्डवेअर इव्हेंमध्ये लॉन्च करणार आहे. परंतू या संबंधित कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही. 2020 साली अ‍ॅप्पल आपला 5 जी मॉडेल लॉन्च करण्याची शक्यता आहे.

इतर कंपन्या देखील लॉन्च करणार 5 जी स्मार्टफोन
अ‍ॅपल आणि गुगलने आतापर्यंत 5 जी स्मार्टफोनची घोषणा केली नाही. परंतू इतर कंपन्यांनी आपले 5 जी स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. Huawei ने मागील महिन्यात Mate 30 आणि Mate 30 Pro चे 5 जी मोबाइल सादर केले आहेत. याआधी Samsung ने देखील Galaxy S10, Galaxy Note 10+, Galaxy Fold चे 5 जी व्हेरिअंट्स सादर केले होते. आता गुगल देखील आपले 5 जी मोबाइल लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. अ‍ॅप्पलने 2020 च्या जानेवारीत जर 5 जी मॉडेल लॉन्च केले तर गुगलची अ‍ॅपलला टक्कर असणार आहे.

visit : policenama.com