‘Google’ नं केली ‘ही’ महत्वाची सेवा ‘बंद’, airtel आणि Jio सारख्या कंपन्या देऊ शकणार नाहीत उत्तम ‘कव्हरेज’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गुगलमुळे भारतातील टेलिकॉम क्षेत्राला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे, याचा परिणाम फोन वापरकर्त्या ग्राहकांना होणार आहे. या निर्णयाने टेलिकॉम कंपन्यांना आपल्या कनेक्टिविटी संबंधित आणि कवरेज संबंधित समस्यांच्या सामना करावा लागू शकतो. एअरटेल, रिलायन्स, जिओ, वोडाफोन व इतर टेलिकॉम कंपन्यांना गुगलच्या सुविधेमुळे आपला नेटवर्क, कनेक्टिविटी संबंधित समस्या शोधता येत होती. परंतू गुगलने ही मोबाइल नेटवर्क इनसाइट्स सेवा अचानक बंद केली आहे.

गुगलने ही सेवा मार्च 2017 साली सुरु केली होती. ही सेवा संपूर्ण जगभरातील डेटा टेलिकॉम कंपन्यांना उपलब्ध करुन देत होती. यातून कंपनीचे नेटवर्क कुठे खराब आहे हे तपासता येत होते. यातून कंपन्या ग्राहकांच्या नेटवर्क संबंधित समस्या सोडवू शकत होत्या.

या सेवेत सर्व डेटा एकत्रित करण्यात येत होता. ही सेवा गुगल विना शुल्क कंपन्यांना पुरवत होती. यात अधिकांश डाटा अ‍ॅण्ड्राइड युजरचा होता. परंतू ही सेवा बंद करण्यामागे ग्राहकांची प्रायवसी गुगलने लक्षात घेतली आहे.

गुगलचे प्रवक्ता विक्टोरियाने हे स्पष्ट केले ही गुगल ही सेवा कायमची बंद करत आहे. याशिवाय यासंबंधित सूचना टेलिकॉम कंपन्यांना देखील पाठवण्यात आली आहे.

आरोग्यविषयक वृत्त