डिलिट न करता WhatsApp चॅट होईल Hide, फक्त फॉलो कराव्या लागतील ‘या’ 5 सिम्पल स्टेप्स
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – व्हॉट्सअपमध्ये सामान्यपणे कोणतेही चॅट लपवण्यासाठी नेहमी ते डिलिट केले जाते. परंतु, तुम्हाला माहित आहे का, व्हॉट्सअप चॅट डिलिट न करता सुद्धा ते लपवता येऊ शकते? होय, व्हॉट्सअपमध्ये हे फीचर अगोदरपासून आहे आणि याचा वापर करणे खुप सोपे आहे.
व्हॉट्सअप चॅट हाइड करण्याची पद्धत
स्टेप 1. यासाठी सर्वप्रथम व्हॉट्सअप अकाऊंट ओपन करावे लागेल. यानंतर तुम्हाला ज्या व्यक्तीचे चॅट हाइड करायचे आहे तिथे जा.
स्टेप 2. त्या व्यक्तीचे चॅट ओपन न करता त्यावर थोडावेळ होल्ड करावे लागेल. काही सेकंदानंतर वर डावीकडे दिलेल्या तीन डॉट्ससोबत काही अन्य पर्याय सुद्धा दिसतील.
स्टेप 3. यामध्ये एक पर्याय Archive बटनचे आहे. या बटनावर क्लिक करताच व्हॉट्सअप चॅट हाइड होईल.
स्टेप 4. जर तुम्हाला हाइड केलेले चॅट पहायचे असेल तर तुम्हाला व्हॉट्सअप चॅटच्या खाली स्क्रोल करावे लागेल. जिथे सर्वात खाली Archivedचा पर्याय मिळेल. यावर क्लिक करून तुम्ही चॅट पाहू शकता.
स्टेप 5. जर तुम्हाला Archived चॅटला Unarchive करायचे असेल तर त्यासाठी चॅटला ओपन करून थोडे टॅप करा. ज्यानंतर तीन डॉट्ससह Unarchive चा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.