IRCTC च्या माध्यमातून आता बस तिकीटही करता येऊ शकते बुक; असे करा बुकिंग

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   भारतीय रेल्वे केटरिंग एँड टुरिझम कॉर्पोरेशनकडून (IRCTC) आत्तापर्यंत फक्त रेल्वे आणि विमानाचे तिकीट बुक करता येऊ शकत होते. पण आता IRCTC ने प्रवाशांसाठी नवी सुविधा देण्याचे सांगितले. त्यानुसार आता IRCTC च्या माध्यमातून बस तिकीटही बुक करता येऊ शकते. म्हणजेच आता रेल्वे, विमान आणि बस तिकीट ऑनलाईन बुकिंग करता येऊ शकते.

असे करता येईल बस तिकीट बुक

जर तुम्ही IRCTC च्या माध्यमातून बस तिकीट बुक करू इच्छिता तर तुम्हाला मोबाईलमध्ये ऍप घ्यावे लागेल आणि ऍपवरच तुम्हाला रेल्वे, बस आणि विमान तिकीट बुकिंग करता येऊ शकेल. ही सेवा देशातील 22 राज्ये आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये उपलब्ध केली जाणार आहे. त्यासाठी सर्व राज्यांतील बस सेवा देणाऱ्या 50,000 पेक्षाही जास्त राज्य रस्ते परिवहन (ST) आणि खाजगी बस ऑपरेटर्सच्या माध्यमातून बुकिंग केले जाते.

असे करा तिकीट बुक…

– www.bus.irctc.co.in वेबसाईटवर जायला हवे. तिथे डेस्टिनेशन सिलेक्ट करावे.

– त्यानंतर डेट सिलेक्ट करून त्या रुटवरील बस उपलब्ध आहे का, याची माहिती घ्यावी.

– त्यानंतर बस, प्रवासाची वेळ आणि बस धावण्याची माहिती तिथे दिली जाईल.

– तिकीटाच्या किमती आणि किती जागा रिकाम्या आहेत याचीही माहिती मिळेल.

– सीट सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला ‘प्रोसिड टू बुक’च्या पर्यायावर क्लिक करायला लागेल. त्यानंतर पेमेंटचा पर्याय निवडावा लागेल.

– जेव्हा तुम्ही त्या तिकीटासाठी पेमेंट कराल तेव्हा तुमचे तिकीट बुक होईल.