Jio Fiber चा नवा प्लॅन लॉन्च, एका महिन्याच्या ‘फ्री’ ट्रायल मध्ये मिळवा 150mbps स्पीडनं अनलिमिटेड डेटा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Reliance Jio ने ‘नए इंडिया का नया जोश’ या नावाने एक ‘Jio Fiber’ प्लॅन लॉन्च केला आहे. या प्लॅनच्या नव्या ग्राहकांना अनलिमिटेड डेटा सोबत 30 दिवसांचा मोफत ट्रायल देण्यात येणार आहे. प्लॅन मध्ये 150mbps ची स्पीड मिळणार आहे. फ्री ट्रायल मध्ये अपलोडिंग आणि डाउनलोड दोन्ही स्पीड सारखे म्हणजे 150mbps असेल. सोबतच फ्री ट्रायलच्या ग्राहकांना 4k सेट टॉप बॉक्स आणि 10 OTT अँप्सचं फ्री सबस्क्रिप्शन मिळणार आहे.

टेरिफ प्लॅनची सुरुवातीची किंमत 399 रुपये

एक महिन्याच्या फ्री ट्रायल नंतर ग्राहक कोणताही प्लॅन निवडू शकतील. ‘नए इंडिया का नया जोश’ टेरिफ प्लान्सची किंमत दर महिना 399 रुपये रुपयांपासून 1499 रुपयांपर्यंत आहे. फ्री ट्रायल नंतर ग्राहक Jio Fiber कनेक्शन काढून टाकू शकतो. त्यासाठी कंपनीकडून कोणताही चार्ज घेतला जाणार नाही. दर महिना 399 रुपयांच्या प्लॅनमध्ये 30mbps ची स्पीड मिळणार आहे. का कंपनीचा सर्वात स्वस्त प्लॅन आहे. पण या प्लॅन मध्ये OTT अँप्सचं फ्री सबस्क्रिप्शन मिळणार नाही. अशाच प्रकारे 699 च्या प्लॅनमध्येही OTT अँप्सचं फ्री सबस्क्रिप्शन मिळणार नाही, पण स्पीड 100mbps असेल.

अपलोडिंग आणि डाउनलोडिंग दोन्ही स्पीड सारखे असणार

999 रुपये आणि 1499 रुपयांच्या प्लॅनमध्ये OTT अँप्सचं फ्री सबस्क्रिप्शन मिळणार आहे. तर 999 रुपयांमध्ये 150mbps स्पीड सोबत 1000 रुपये किंमतीच्या 11 OTT अँप्सचं सबस्क्रिप्शन मिळणार आहे. 1499 रुपयांच्या प्लॅनमध्ये 1500 रुपये किंमतीचे 12 OTT अँप्स मिळतील. या प्लॅनमध्ये अपलोडिंग आणि डाउनलोडिंग दोन्ही स्पीड सारखे ठेवण्यात आले आहेत. शक्यतो अपलोडिंग आणि डाउनलोडिंग दोन्ही स्पीडमध्ये खूप फरक असतो.

प्रत्येक घरात Jio Fiber पोहचवण्याचं लक्ष्य

Reliance Jio ने Jio Fiber चा नवा प्लॅन लॉन्च केला आहे. त्यावेळी प्रत्येक घरात Jio Fiber पोहचवण्याचं लक्ष्य असल्याचं आकाश अंबानी यांनी सांगितलं. Jio मुळे मोबाईल कनेक्टिव्हिटी मध्ये भारत सर्वात मोठा आणि वेगाने वाढणारा देश बनला आहे, आता Jio Fiber भारताला जगात ब्रॉडबँड मध्ये पुढे घेऊन जाईल.