Jio ने ‘Saarthi’ मोबाईल अ‍ॅप केले अपडेट, करणार ‘ऑनलाइन’ रिचार्जला मदत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Reliance jio ने आपल्या युजर्ससाठी jio Saarthi डिजिटल असिस्टेंस लॉन्च केला आहे. हा असिस्टेंस यूजर्सला ऑनलाइन रिचार्ज करण्यास मदत करेल. हे एक इंटरअ‍ॅक्टिव इन अ‍ॅप असिस्टेंस आहे जे यूजर्सला १२ भाषेत मदत करेल. हे अ‍ॅप my jio अ‍ॅप बरोबर इंटिग्रेटेड असेल. जेव्हा तुमचा रिचार्ज पॅक संपेल, हा असिस्टेंस तुम्हाला तुमचा मोबाइन रिचार्ज करण्यास मदत करेल. याबाबतची माहिती हे असिस्टेंस तुम्हाला देईल. हा असिस्टेंस तुम्हाला रिचार्ज प्लॅन निवडण्यास देखील मदत करेल.

Jio Saarthi असिस्टेंस तुम्हाला My Jio रिचार्ज करताना हे अ‍ॅप दिसेल, हे अ‍ॅप आधी फक्त हिंदी आणि इंग्रजी भाषेत उपलब्ध होते, मात्र आता हे अ‍ॅप १२ प्रादेशिक भाषेत उपलब्ध असेल. म्हणजेच तुम्ही आता तुमच्या भाषेत अ‍ॅप वापरू शकतात. जेव्हा तुम्हाला मोबाइल नंबरचे रिचार्ज कराल तर तुम्हाला तुमचे पेमेंट डिटेल लोकेट करण्यास मदत करेल. या डिजिटल असिस्टेंसच्या मदतीने तुम्ही स्वत: तुमचा मोबाइल नंबर रिचार्ज करु शकतात.

डिजिटल पेमेंटला प्रोस्ताहन

हा पहिला डिजिटल इनिशिएटिव आहे, जो यूजर्सला सेल्फ रिचार्ज करण्यास प्रेरित करेल. jio Saarthi च्या मदतीने ऑनलाइन रिचार्ज करणाऱ्या यूजर्सची संख्येत वाढ होताना दिसत आहे. jio यूजर्स या असिस्टेंसच्या मदतीने कुठूनही आणि कधीही आपला नंबर रिचार्ज करु शकतात. याने डिजिटल ट्राजॅक्शनला प्रोस्ताहन देईल.

आरोग्यविषयक वृत्त