Jio ने सुरू केली 5G लाँचिंगची तयारी, खरेदी केला 57 हजार कोटीचा ‘स्पेक्ट्रम’

नवी दिल्ली : पोलिसनामा ऑनलाईन – रिलायन्स जिओने सर्व 22 सर्कलसाठी स्पेक्ट्रम खरेदी केला आहे. ज्याची किंमत 57123 कोटी रुपये इतकी आहे. या खरेदीनंतर रिलायन्स जिओकडे एकूण 1717 मेगा हर्ट्ज (अपलिंक + डाउनलिंक) होईल, जे पूर्वीच्या तुलनेत 55 टक्के अधिक आहे. तसेच, हे 5 जी सेवा रोलआउट करण्यास मदत करू शकते. रिलायन्स जिओने अलीकडेच जाहीर केले होते की, त्याच्या वतीने स्वदेशी 5 जी तंत्रज्ञान विकसित केले गेले आहे, ज्याची क्वालकॉमच्या मदतीने अमेरिकेत चाचणी घेतली आहे.

दुसरीकडे, एअरटेल कंपनीची 5G सेवा देखील सज्ज आहे, ज्यांची व्यावसायिक चाचणी हैदराबादमध्ये आधीच झाली आहे. स्पेक्ट्रम लिलावादरम्यान एअरटेलने रेडिओवेव्हसाठी 18,699 कोटी रुपयांची बोलीही लावली आहे. यामुळे कंपनीला येत्या काळात 5G सेवा प्रदान करण्यास मदत होणार आहे.

यंदा Jio ची 5G लाँच होणार
रिलायन्सचे मालक मुकेश अंबानी यांनीही यंदा 5 जी बाजारात आणण्याची घोषणा केली आहे. जिओच्या मते, कंपनीची 5 जी इन्फ्रास्ट्रक्चर पूर्णपणे तयार आहे. कंपनी फक्त 5 जी रोलआउट करण्यासाठी सरकारच्या मंजुरीची प्रतीक्षा करीत आहे. असा दावा एअरटेल कंपनीनेही केला आहे. केंद्र सरकारच्या मते, जगात सर्वात वेगवान वेगाने भारतात 5 जी सेवा सुरू केली जाईल, जी पूर्णपणे स्वदेशी असेल. रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी म्हणाले की, आम्ही भारतात डिजिटल ठसा आणखी उमटविण्यास तयार आहोत. त्याचबरोबर 5 जी रोलआउटसाठी स्वतः तयार राहू.

संपला स्पेक्ट्रमचा लिलाव, स्पेक्ट्रम रिलायन्स जिओकडे
भारतातील टेलिकॉम स्पेक्ट्रमचा पाच वर्षांत पहिला लिलाव मंगळवारी 77,814.80 कोटी रुपयांच्या स्पेक्ट्रमच्या खरेदीसह संपला. स्पेक्ट्रम मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओने विकत घेतला आहे. स्पेक्ट्रमच्या किंमती पुढील 18 वर्षांत टेलिकॉम कंपन्यांद्वारे भरल्या जातील. जिओकडे सरासरी 15.5 वर्षांसाठी स्पेक्ट्रम उपलब्ध आहे.