मुकेश अंबानींनी 2G बाबत मोदी सरकारकडं केली ही मोठी मागणी, म्हणाले – ‘तात्काळ पावले उचलावीत’

नवी दिल्ली : रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेयरमन मुकेश अंबानी यांनी शुक्रवारी सरकारकडे 2जी सर्व्हिस बंद करण्याबाबत तात्काळ प्रभावी पाऊल उचलण्याची मागणी केली. ज्यामुळे 30 कोटी फीचर फोन वापरणार्‍या सुमारे 30 कोटी यूजर्सना इंटरनेट उपलब्ध करून देता येईल. त्यांनी म्हटले की, भारतासह जगभरातील बहुतांश देश ज्यावेळी 5जी वापरण्याच्या टप्प्यात पोहचले आहेत, अशावेळी भारतातील 30 कोटी यूजर्सला 2जीच्या काळातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

25 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी देशात प्रथम मोबाईल कॉलची सुरूवात झाली, यानिमित्ताने अंबानी यांनी भारतीय सेल्युलर आपरेटर्स संघाच्या (सीओएआय) देशाचे डिजिटल उड्डाण नावाने आयोजित एका वर्च्युअल कार्यक्रमात म्हटले की, आता वेळ आली आहे की, देशाला 2जी मुक्त बनवूण त्यास इतिहास जमा केले पाहिजे.

यासाठी मुकेश अंबानी यांनी सरकारला तात्काळ प्रभावाने एक पॉलिसी आणण्याची मागणी केली आहे. अंबानी यांच्याकडून अगोदरच घोषणा करण्यात आली होती की, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे टेलीकॉम आर्म भारताला 2जी मुक्त बनवण्यासाठी जीओ फीचर फोनने लोकांना परवडणार्‍या स्मार्टफोनवर शिफ्ट करण्याचा प्रयत्न करत आहे.

अंबानी म्हणाले, लॉकडाऊनमध्ये मोबाईल, जीवनाचा जरूरी भाग बनून समोर आला आहे. लोकांना सशक्त बनवण्याचे एक माध्यम बनले आहे. मोबाईलने राष्ट्राला कठिण काळातही एकत्र ठेवले. अर्थव्यवस्थेचे चाक मोबाईलच्या बळावरच फिरताना दिसले. डिजिटल अर्थव्यवस्थेत जीओच्या योगदानाबाबत बोलताना अंबानी म्हणाले, डिजिटल प्लॅटफॉर्म आमच्या लाखो शेतकर्‍यांना, छोट्या व्यापार्‍यांना, ग्राहकांना, छोट्या आणि मध्यम उद्योगांना, विद्यार्थी, शिक्षक, आरोग्य कर्मचारी आणि इनोव्हेशनला सशक्तकरणाचे नवे आणि प्रगत उपकरण प्रदान करेल.

यामुळे आपल्या प्रतिभाशाली तरूणांसाठी नवीन आणि आकर्षक रोजगार आणि व्यवसायाच्या नवीन संधी निर्माण होतील. जीओने आपल्या लाँचच्या पूर्वी चार वर्षात 40 कोटीच्या जवळपास ग्राहक जोडले आहेत. चेयरमन मुकेश अंबानी यांनी 43व्या एजीएममध्ये म्हटले की, जीओने 5जी सोल्यूशन बनवले आहे, जे भारतात वर्ल्ड क्लास 5जी सर्व्हिस प्रदान करेल. याचे डिझाइन पूर्णपणे डेव्हलप केले आहे. स्पेक्ट्रमची उपलब्धता होताच याची ट्रायल सुरू होईल.