फायद्याची गोष्ट ! फक्त 5 रूपयांमध्ये संपुर्ण महिना Netflix बघण्याची ‘सुवर्ण’संधी, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नेटफ्लिक्सचा वापर आज अनेकजण करत आहेत. यासाठी आपल्याला 199 रुपयांपासून 799 रुपयांपर्यंत शुल्क भरावे लागते. परंतु, तुम्हाला नेटफ्लिक्सचे एक महिन्याचे सबस्क्रिप्शन अवघ्या 5 रूपयात मिळाले तर? तुमचा यावर विश्वास बसत नसला तरी ही बातमी अगदी खरी आहे. कारण नेटफ्लिक्सने एक नवीन मार्केटिंग प्रमोशनल ऑफर सुरू केली आहे. या अंतर्गत सध्याच्या आणि नवीन यूजर्सपैकी निवडक यूजर्सना अवघ्या 5 रुपयात एक महिन्यांचे नेटफ्लिक्स सबस्क्रिप्शन देण्यात येईल.

याबाबत नेटफ्लिक्सच्या कस्टमर केअरशी बातचीत केली असता सांगण्यात आले की, हे कंपनीचे एक नवे प्रोमो डिस्काउंट आहे. या अंतर्गत सध्याच्या आणि नव्या यूजर्सपैकी काही निवडक यूजर्सला ही ऑफर उपलब्ध करून दिली जाणार आहे. एखाद्या सध्याच्या यूजरने अकाउंट उघडले आणि त्यास या ऑफरचे पॉप-अप मिळाले तर तो यावर क्लिक करून ही ऑफर अ‍ॅक्टिवेट करू शकतो. जर एखादा नवीन यूजर नेटफ्लिक्सवर साइन इन किवां साइन अप करत असेल तर त्याला सुद्धा या ऑफरचे पॉप-अप मिळू शकते. अशावेळी जर तुम्हाला नशीबाने साथ दिली तर तुम्हाला नेटफ्लिक्सचे सबस्क्रिप्शन केवळ 5 रुपयात मिळू शकते.

199 रुपयांचा एक मोबाइल प्लान
याअंतर्गत तुम्हाला बेसिक एचडी व्हिडिओ क्वालिटी दिली जाईल. सोबतच तुम्ही हे केवळ तुमचा फोन किंवा टॅबलेटमध्येच एक्सेस करू शकता. यामध्ये 1 स्क्रीन उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामध्ये तुम्हाला अनलिमिटेड मूव्हीज आणि टीव्ही शोज मिळतात. हे तुम्ही कधीही कॅन्सल करू शकता.

499 रुपयांचा बेसिक एचडी प्लॅन
या अंतर्गत तुम्हाला बेसिक एचडी व्हिडिओ क्वालिटी दिली जाईल. हे तुम्ही तुमच्या फोन किंवा टॅबलेटसह कम्प्यूटरमध्ये सुद्धा अ‍ॅक्सेस करू शकता. यामध्ये 1 स्क्रीन उपलब्ध करून दिली जाईल. यामध्ये अनलिमिटेड मूव्हीज आणि टीव्ही शोज मिळतात. हे तुम्ही कधीही कॅन्सल करू शकता.

649 रुपयांचा स्टँडर्ड प्लॅन
या अंतर्गत तुम्हाला फूल एचडी व्हिडिओ क्वालिटी दिली जाते. हे तुम्ही फोन किंवा टॅब्लेटसह कम्पूटरवरसुद्धा अ‍ॅक्सेस करू शकता. यामध्ये 2 स्क्रीन उपलब्ध करून दिल्या आहेत. यामध्ये तुम्हाला अनलिमिटेड मूव्हीज आणि टीव्ही शोज मिळतात. हे तुम्ही कधीही कॅन्सल करू शकता.

799 रूपयांचा प्रिमियम प्लॅन
या अंतर्गत तुम्हाला 4 के + एचडीआर व्हिडिओ क्वालिटी दिली जाते. हे तुम्ही तुमचा फोन किंवा टॅबलेटसह कम्प्यूटरवर सुद्धा एक्सेस करू शकता. यामध्ये 4 स्क्रीन उपलब्ध करून देण्यात येतात. यामध्ये तुम्हाला अनलिमिटेड मूव्हीज आणि टीव्ही शोज मिळतात. हे तुम्ही कधीही कॅन्सल करू शकता.