Reliance Jio देतोय 251 रूपयांच्या ‘प्लॅन’मध्ये दररोज 2GB चा डाटा, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – टेलिकॉम इंडस्ट्रीत सुरू असलेल्या स्पर्धेमुळे टेलिकॉम कंपन्या आपल्या प्लॅन्सच्या किमतीत कपात करत आहेत. सोबतच काही नवीन प्लॅन बाजारात आणत आहेत. यामुळे यूजर्सला एक चांगला प्लॅन निवडणे थोडे अवघड होऊ शकते. जर तुम्ही रिलायन्स जिओ यूजर्स आहात आणि डेली डाटा वापरासाठी एक चांगला प्लॅन खरेदी करायचा असेल तर 251 रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला अनेक फायदे मिळतील.

जिओचा 251 रूपयांचा प्रीपेड प्लॅन अशा युजर्ससाठी आहे ज्यांना डेली डाटासाठी कमी किमतीचा प्लॅन खरेदी करायचा आहे. या प्लॅनची व्हॅलिडीटी 51 दिवसांची आहे. यास ‘जिओ क्रिकेट पॅक’ नाव देण्यात आले आहे.

जिओच्या 251 रुपयांच्या प्लॅनचे फायदे
यामध्ये रोज 2जीबी डाटाची सुविधा आहे. हा केवळ डाटा प्लॅन आहे. यामध्ये युजर्सला कॉलिंग किंवा एसएमएसची कोणतीही सुविधा नाही. म्हणजे याचा वापर तुम्ही केवळ डाटासाठी करू शकता. जिओने खास क्रिकेट प्रेमींचा विचार करून हा सादर केला आहे. हा क्रिकेट डाटा पॅक आहे. याचा वापर युजर्स क्रिकेट मॅच पाहण्यासाठी करू शकतात.

जिओने यूजर्ससाठी जिओ कॅशबॅक 2020 ची घोषणा केली होती. या ऑफर अंतर्गत युजर्सला डिजिटल पेमेन्टद्वारे आपला मोबाईल नंबर रिचार्ज केल्यावर 2,020 पर्यंत कॅशबॅक ऑफर देण्यात येत आहे. परंतु, या ऑफरचा लाभ केवळ डिजिटल पेमेंटवरच उपल्ब्ध आहे.