रिलायन्स जिओची ‘ही’ योजना 100 रुपयांपेक्षा कमी किंमतीत उपलब्ध, मिळेल डेटा आणि कॉलिंगचा फायदा

नवी दिल्लीः वृत्तसंस्था – कोरोना काळात लोकांनी मोबाईल इंटरनेटचा प्रचंड वापर केला आहे. अशा परिस्थितीत टेलिकॉम कंपन्यांनीही युजर्सची सोय लक्षात घेऊन अनेक परवडणारी योजना सुरू केली आहेत. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत रिलायन्स जिओच्या अशा किफायतशीर योजनांबद्दल, ज्या 100 रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या आहेत. परंतु या योजनांमध्ये युजर्सला डेटा आणि अमर्यादित कॉलिंगची सुविधा असेल. चला तर मग या योजनांविषयी सविस्तर जाणून घेऊया….

रिलायन्स जिओने आपल्या युजर्सला अनेक परवडणारे 4 जी डेटा व्हाउचर प्रदान केले आहेत. ज्याची किंमत 11 रुपये, 21 रुपये, 51 रुपये आणि 101 रुपये आहे. या योजनांची किंमत निःसंशयपणे कमी आहे, परंतु बरेच फायदे युजर्सला दिले जात आहेत.

11 रुपयांची योजना
रिलायन्स जिओच्या 11 रुपयांच्या योजनेबद्दल बोलायचे म्हणले तर यात युजर्सला 800 एमबी डेटा देण्यात येत आहे. याशिवाय कॉल करण्यासाठी 75 मिनिटेही उपलब्ध आहेत. जे युजर्स इतर नेटवर्कवर जिओकडून कॉल करण्यासाठी वापरू शकतात.

21 रुपयांची योजना
21 रुपयांच्या व्हाउचरमध्ये यूजर्सना अमर्यादित 2 जीबी डेटा सुविधा मिळेल. तसेच, जिओकडून इतर नेटवर्कवर कॉल करण्यासाठी 200 मिनिटे देखील दिली जातील. युजर्स Jio to Jio पर्यंत अमर्यादित कॉलिंगचा लाभ घेऊ शकतात.

51 रुपयाची योजना
रिलायन्स जिओ युजर्स देखील 51 रुपयांची परवडणारी योजना खरेदी करू शकतात. या योजनेत 6 जीबी अमर्यादित डेटा देण्यात येत आहे. इतकेच नाही तर युजर्सला इतर नेटवर्कवर जिओकडून कॉल करण्यासाठी 500 मिनिटेही मिळतील.

101 रुपयांची योजना
या योजनेत 12 जीबी अमर्यादित डेटा देण्यात येत आहे. याव्यतिरिक्त, कॉल करण्यासाठी 1000 मिनिटे उपलब्ध आहेत. ज्याचा लाभ यूजर्स जिओ कडून अन्य नेटवर्कवर कॉल करण्यासाठी घेऊ शकतात.