खुशखबर ! टाटा स्कायचा ‘बंपर’ प्लॅन, करा १२ महिन्यांचे ‘रिचार्ज’, पहा १३ महिने TV

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Tata Sky ने आपला फ्लेक्सी अ‍ॅनु्अल प्लॅनमध्ये काही बदल केले आहेत आणि सब्सक्रायबर्सला आकर्षित करण्यासाठी नवे ऑफर जोडले आहेत. कंपनीने या नव्या प्लॅनला रिलॉन्च केला आहे. DTH प्रोवाइडर आता आपली एक महिन्यांची सेवा यात ग्राहकाला मोफत देणार आहे. याआधी हा प्लॅन रिचार्ज केल्यानंतर ग्राहकांना १२ महिने सेवा घेता येत होती. आता मात्र ही सेवा ग्राहक १३ महिेने वापरु शकणार आहेत. हा प्लॅन या आठवड्यातच सादर करण्यात आला आहे.

१३ महिने पहा टीव्ही

टाटा स्कायच्या मते सब्सक्रायबर्स आपल्या पसंतीचा पॅक १२ महिन्यासाठी रिचार्ज करु शकतात. या १२ महिन्यांच्या रिचार्जमध्ये सब्सक्रायबर्सला १३ महिनांचा अ‍ॅक्सेस मिळेल. अतिरिक्त एक महिन्याचे फ्री अ‍ॅक्सेस रिचार्ज ४८ तासात तुमच्या टाटा स्कायच्या अकाऊंटला जमा होईल. यशिवाय बोनस अ‍ॅक्सेसच्या बरोबर या प्लॅनमध्ये तुम्ही चॅनल अ‍ॅड देखील करु शकतात आणि आवश्यक असल्यास चॅनल ड्राॅप देखील करु शकतात. याशिवाय गरज भासल्यास तुम्ही तुमचे अकाऊंट बंद देखील करण्यात येऊ शकते. तसेच हा प्लॅन रिचार्ज केल्यास रिचार्जच्या रक्कमे एवढे फ्री कूपन्स आणि अनेक डिजिटल वॉलेटची ऑफर देण्यात आली आहे.

ऑफर मिळवण्यासाठी हे करा

Tata Sky New Flexi Annual Plan चा लाभ घेण्यासाठी तुम्हाला १२ महिन्याचे रिचार्ज करावे लागेल. यानंतर तुम्हाला याच रिचार्ज प्लॅनमध्ये १ महिना आधिक सेवा उपलब्ध होईल. त्यामुळे तुम्ही १३ महिने या सेवेचा लाभ घेऊ शकतात. या प्लॅनची रिचार्ज रक्कम तुम्ही टाटा स्कायच्या वेबसाइटवर आणि अ‍ॅपवर पाहू शकतात.

आरोग्यविषयक वृत्त