24GB हायस्पीड डेटा असणाऱ्या BSNLच्या या 2 प्रमोशनल ऑफरची वाढविण्यात आली मुदत, आता मार्च 2021 पर्यंत घेता येईल फायदा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएलच्या दोन प्रमोशनल ऑफरची अंतिम मुदत मार्च 2021 पर्यंत वाढविण्यात आली आहे. बीएसएनएल प्रमोशनल ऑफर म्हणून 1199 रुपये आणि 139 रुपयांच्या सवलतीच्या किंमतीवर 1499 आणि 187 रुपयांचे प्रीपेड प्लॅन उपलब्ध करून देते. दरम्यान, बीएसएनएलकडून प्रमोशनल ऑफरची अंतिम मुदत वाढवण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी या दोन्ही ऑफर 30 नोव्हेंबरपर्यंत आणि नंतर 31 डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आल्या आहेत. ही तिसरी वेळ आहे, जेव्हा बीएसएनएल योजना 31 मार्चपर्यंत वाढविण्यात आली आहे.

1199 रुपयांचा रिचार्ज प्लॅन
या दोन्ही योजनांच्या फायद्यांबद्दल बोलायचे झाले तर 1,499 रुपयांची बीएनएसएल योजना 1,199 रुपयांच्या सवलतीत उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या रिचार्ज योजनेवर दररोज 250FUP मिनिटे उपलब्ध असतात. त्याच वेळी, 24 जीबी हाय स्पीड डेटा आणि 100 एसएमएस उपलब्ध आहेत. या रिचार्ज योजनेवर 365 दिवसांची वैधता देण्यात येते.

139 रुपयांचा रिचार्ज प्लॅन
त्याचबरोबर स्पेशल टॅरिफ व्हाउचर ( STV) 187 ला 139 रुपयांत उपलब्ध करण्यात येत आहे. ही योजना दररोज 250 FUP मिनिटे प्रदान करते. यासह दररोज 2 जीबी हाय स्पीड डेटा मिळतो आणि दररोज 100 एसएमपी सुविधा मिळते. ही योजना 28 दिवसांसाठी आहे. या दोन्ही योजना चेन्नई सर्कलसाठी आहेत.

या प्लॅनला करण्यात आले रिवाइन
यापूर्वी बीएसएनएलने 1,999 रुपयांच्या वार्षिक प्रीपेड प्लॅनला रिवाईन करण्यात आले होते. ही योजना देखील 365 म्हणजे एका वर्षाच्या वैधतेसह येते. यामध्ये ओटीटी अ‍ॅप सबस्क्रिप्शनदेखील देण्यात आले आहे. या योजनेत अमर्यादित व्हॉईस कॉलिंगची सुविधा देण्यात आली असून दररोज 3 जीबी इंटरनेट उपलब्ध आहे. ही योजना 365 दिवसांसाठी 1095 जीबी डेटासह येते.