‘Truecaller’ देणार ‘WhatsApp’सारखं ग्रुप चॅटिंगचं फिचर, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Truecaller अ‍ॅप मागील काही दिवसांपासून आपल्या यूजर्ससाठी विविध फिचर्स आणत आहे. यात कंपनीने नवे ग्रुप चॅट फिचर आणले आहे. कॉलर आयडी सर्विस प्रोव्हायडरने मागील वर्षी चॅटिंग फिचर इंट्रोड्यूस केले होते. आता अ‍ॅपमध्ये ग्रुप चॅटिंगचे फिचर जोडले आहे. यात WhatsApp सारखे चॅटिंग फिचर असेल. कंपनीने या ग्रुप चॅटिंगच्या फिचरमध्ये इनवाइट, हिडन नंबर, चॅट आणि एसएमएस दरम्यान सिमलेस स्विचिंग आणि कॅटेगराइज इनबॉक्स सारखे फिचर दिले आहे. या फिचरचा आनंद अ‍ॅण्ड्राईड आणि आयओएस असलेले दोन्ही यूजर्स घेऊ शकतील. हे अ‍ॅप तुम्ही गुगल प्ले स्टोअर आणि अ‍ॅप स्टोर दोन्हीकडून डाऊनलोड करु शकतात.

असे वापरता येईल फिचर
या फिचरचा वापर करण्यासाठी यूजरला अ‍ॅपचे नवे अपडेट इंस्टॉल करावे लागेल. ग्रुप चॅटिंग फिचरला यूजर्स ग्रुप इन्वाइट्सच्या माध्यमातून अ‍ॅक्सेस करु शकतात. यात पीयर टू पीयर चॅटिंग सेवा मिळत नाही. यात ग्रुप चॅटसाठी इन्वाइट केल्यावर यूजर्स इन्व्हीटेशनला अ‍ॅक्सेप्ट किंवा डिक्लाइन करु शकतात. इनविटेशन अ‍ॅक्सेप्ट केल्यास यूजर ग्रुप मेंबर बनेल. तर डिक्लाइन केले तर ग्रुप मेंबर बनता येणार नाही.

हिडन नंबर फिचर 
कंपनीने यूजर्सला ग्रुप चॅट मध्ये एक युनिक हिडन नंबर फिचर दिले आहे. या फिचरच्या माध्यमातून तुम्ही आवश्यकता असेल तेव्हा तुमचा नंबर हिडन फिचर वापरुन हिडन करु शकतात. तुम्ही अनेक ग्रुपचे मेंबर असाल आणि तुम्ही तुमच्या नंबर हिडन नंबर ठेवू इच्छितात तर तुम्ही हे फिचर वापरु शकतात. या ग्रुप चॅटमध्ये तुमचा नंबर फक्त त्यांनाच दिसेल ज्यांच्याकडे तुमचा नंबर त्यांच्या मोबाइल लिस्टमध्ये सेव्ह असेल. इतर कोणत्याही मेंबरला तुमचा नंबर शो होणार नाही. या प्रकारे प्रायवसी लक्षात घेऊन हे फिचर कंपनीकडून यूजर्सला उपलब्ध करुन देण्यात आले आहे.

Visit : Policenama.com 

शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी
बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या