फोन खरेदीसाठी ऑक्टोबरपर्यंत करा प्रतिक्षा, ‘हे’ 5 शानदार स्मार्टफोन येताहेत भारतात, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय स्मार्टफोन बाजार ऑक्टोबर महिन्यात खुप बहरणार आहे. कारण आगामी ऑक्टोबर महिन्यात फोल्डेबल स्मार्टफोन Motorola Razr 5G सह एकापेक्षा एक सरस स्मार्टफोन लाँच होतील. यामध्ये बजेट कॅटेगरीपासून फ्लॅगशिप स्मार्टफोन सहभागी असतील. अशावेळी जर तुम्हाला नवा स्मार्टफोन खरेदी करायचा असेल, तर ऑक्टबरपर्यंत प्रतिक्षा केली पाहिजे, कारण या दरम्यान अनेक दर्जेदार स्मार्टफोन लाँच होणार आहेत.

Motorola Razr 5G
संभाव्य किंमत – एक लाख रुपये
हा फोल्डेबल फोन ऑक्टोबरमध्ये लाँच होत आहे. हा फोन फोल्ड केल्यानंतरही यूजर्स याच्या सेकेंडरी स्क्रीनवर नोटिफिकेशन पाहू शकतात. सोबतच मॅसेजला रिप्लायसुद्धा करू शकतात. फोनमध्ये 6.2 इंचाची मेन स्क्रीन जिचे रिझोल्यूशन 2142×876 पिक्सल आहे. तर फोल्ड केल्यानंतर 800×600 पिक्सल स्क्रीन रिझोल्यूशनसह 2.7 इंचाची स्क्रीन आहे. यामध्ये फोटोग्राफीसाठी 48MP मेन कॅमेरा आहे, ज्याचा वापर फोल्ड झाल्यानंतर यूजर्स 20MP कॅमेर्‍याचा वापर करू शकतात. हा फोन 2.3GHz Snapdragon 765G प्रोसेसरवर काम करतो, ज्यामध्ये 5जी मॉडल इंटीग्रेटेड आहे. यामध्ये 8जीबी रॅम आणि 256जीबी इंटरनल स्टोरेज आहे. पावर बॅकअपसाठी 2,800mAh ची बॅटरी, जी 15W फास्ट चार्जिंग सपोर्टसह असेल.

Samsung Galaxy F41
संभाव्य किंमत – 15 ते 20 हजार रुपये
हा फोन भारतात 8 ऑक्टोबरला सायंकाळी साडेपाच वाजता लाँच होत आहे. फोनमध्ये 6,000mAh ची पावरफुल बॅटरी Samsung Galaxy F41 मध्ये 6.4 इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले दिला जाऊ शकतो. हा स्मार्टफोन Exynos 9611 चिपसेटवर सादर केला जाईल. यास दोन स्टोरेज वेरियंट असतील. एक स्टोरेजमध्ये 6जीबी + 64जीबी स्टोरेज आणि दुसर्‍या मॉडलमध्ये 6जीबी + 128जीबी स्टोरेज असेल. यात व्हिडिओ कॉलिंग आणि सेल्फीसाठी 32एमपीचा फ्रंट कॅमेरा असेल. फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप असेल. याचा प्रायमरी सेंसर 64एमपीचा असेल. हा ब्लॅक, ब्लू आणि ग्रीन कलर वेरियंटमध्ये लाँच केला जाऊ शकतो.

OnePlus 8T 5G
संभाव्य किंमत – 50 ते 60 हजार रुपये
हा स्मार्टफोन भारतात 14 ऑक्टोबरला लाँच होईल. फोन 50 हजार रुपयांच्या प्रारंभिक किमतीत सादर होऊ शकतो. स्मार्टफोनमध्ये 65W Warp फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळेल. तर पावरबॅकसाठी 4,500mAh ची बॅटरी मिळेल. यात 6.5 इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले दिला जाईल, जो 120Hz रिफ्रेश रेट आणि HDR10+ सपोर्टसह येईल. यात 5जी कनेक्टिव्हिटी सपोर्ट दिला आहे आणि हा Snapdragon 865 चिपसेटवर सादर होईल. हा दोनर स्टोरेज मॉडलमध्ये येईल. याच्यात क्वाड रियर कॅमेरा सेटअप असेल आणि प्रायमरी सेंसर 48एमपीचा असेल. तर 16एमपीचा अल्ट्रा वाईड अँगल, 5एमपीचा मायक्रो शूटर आणि 2एमपीचा मोनोक्रोम सेंसर आहे. फोनचा फ्रंट कॅमेरा 16एमपी असेल. यामध्ये सिक्युरिटीसाठी इन-डिस्प्ले फिंगर प्रिंट सेंसर असेल.

Nokia 3.4
संभाव्य किंमत – 10 से 15 हजार रुपये
याची लाँचिंग भारतात ऑक्टोबरमध्ये होणार आहे. याच्यात 6.39 इंचाचा पंच होल एचडी प्लस डिस्प्ले मिळेल. ज्याचे रिझोल्यूशन 720 x 1560 पिक्सल असेल. सोबतच ऑस्पेक्ट रेश्यो 19.5:9 असेल. फोनमध्ये प्रोसेसरम्हणून 2.0GHz octa-core Snapdragon 460 दिला जाऊ शकतो. फोन 4जीबी रॅम, 64 जीबी स्टोरेजमध्ये येईल. सोबतच icroSD कार्डच्या मदतीने 512जीबी पर्यंत मेमरी वाढवता येईल. रियर पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. याचा प्रायमरी कॅमेरा 13एमपी, 5एमपी आणि 2एमपी डेप्थ सेंसरसह येईल. तर फ्रंटमध्ये 8एमपी कॅमेरा असेली. यात 4,000एएमएचची बॅटरी असेल. फोन अँड्रॉईड 10 OS वर बेस्ड आहे.

Nokia 2.4
संभाव्य किंमत – 7,999 रुपये
हा फोन अँड्रॉईड 10 बेस्ड ऑपरेटिंग सिस्टमवर काम करेल. सोबतच फोनमध्ये लवकरच अँड्रॉईड 11 चा सपोर्ट देण्याची घोषणा केली आहे. यात 6.5 इंचाचा LCD डिस्प्ले, octa-core MediaTek Helio P 22 चिपसेट, दोन वेरियंट 2जीबी रॅम-32जीबी स्टोरेज आणि 3जीबी रॅम- 64जीबी स्टोरेज, फोटोग्राफीसाठी रियर पॅनलवर ड्यूअल कॅमेरा, 13एमपी प्रायमरी सेंसरसह 2.2 अपर्चर लेंस आणि 2एमपी डेप्थ सेंसर, फ्रंट पॅनलवर सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 5एमपी कॅमेरा, 4,500एमएच बॅटरी 5 डब्ल्यू माइक्रो यूएसबी चार्जच्या मदतीने चार्ज होणार, इत्यादी फिचर असतील.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like