काय सांगता ! होय, Video ‘गेम’ खेळणं असू शकतो सर्वात ‘हेल्दी’ TimePass, जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) मानलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तुम्हाला तुमच्या मोबाइल, कॉम्प्युटरवर व्हिडिओ गेम खेळायला आवडत असेल तर सद्य परिस्थितीत तो सर्वात हेल्दी आणि उत्तम टाइमपास होऊ शकतो. ही बाब जागतिक आरोग्य संघटनेने मानली असून गेम बनवणारी कंपनी Zynga ने शनिवारी एक नवीन उपक्रम #PlayApartTogether सुरु केला आहे. या उपक्रमात गेम निर्माता कंपनीने लोकांना लॉकडाऊन दरम्यान सोशल डिस्टंसिंग ठेवण्यास आणि स्वतःच्या मनोरंजनासाठी व्हिडिओ गेम खेळण्याचा आणि फिजिकल ऍक्टिव्हिटी करण्यास प्रेरित केले आहे.

Zynga च्या या उपक्रमाला WHO चा सपोर्ट मिळाला असून याअगोदरही जागतिक आरोग्य संघटनेने मेंटल हेल्थ डिसऑर्डरसाठी व्हिडिओ गेमला सर्वात उत्तम उपचार असल्याचे सांगितले होते. WHO चे अँबॅसिडर Ray Chambers यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, यामुळे लाखो लोकांपर्यंत कोविड-१९ पासून बचावाचा संदेश पोहोचू शकतो. त्यांनी म्हटले की, गेमिंग कंपनीकडून प्लेयर्सला सोशल डिस्टंसिंग ठेवण्यास आणि हॅन्ड हायजिन ठेवण्यास प्रोत्साहित केले पाहिजे.

त्यांनी आपल्या पुढच्या ट्विटमध्ये म्हटले की, यावेळी आपण या महामारीमुळे खूप मोठ्या वाईट टप्प्यातून जात आहोत. गेम इंडस्ट्री कंपनीकडे ग्लोबल युजर्स असल्यामुळे आम्ही सगळ्यांना #PlayApartTogether साठी प्रोत्साहित केले पाहिजे. जास्तीत जास्त फिजिकल डिस्टंसिंग आणि इतर आवश्यक पावले कोरोना व्हायरसच्या पासून जीव वाचवू शकतात.

Ray Chambers यांच्या ट्विटनंतर WHO च्या डायरेक्टर जनरलनेही रिट्वीट करत लिहिले आहे की, गेम इंडस्ट्रीला मोबिलाइज करण्यासाठी धन्यवाद. आपल्याला सगळ्यांना एकत्र येऊन #PlayApartTogether करत कोरोना व्हायरसला हरवले पाहिजे. मल्टीप्लेयर सारख्या सुविधा असल्यामुळे व्हिडिओ गेम यावेळी केवळ मनोरंजनाचे साधन नाही तर एकमेकांपासून सोशली कनेक्ट राहण्याचेही साधन होऊ शकते.