WhatsApp नं भारतात सुरू केलं ‘खास’ कॅम्पेन, आता कंपनी शेअर करणार लोकांच्या ‘सत्य’ कथा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपने भारतात आपली ब्रँड मोहीम सुरू केली आहे आणि या मोहिमेला ‘It’s Between You’ असे नाव देण्यात आले आहे. या मोहिमेच्या माध्यमातून कंपनी लोकांना हे सांगेल की, सोशल डिस्टंसिंगचे पालन करताना लोकांनी एकमेकांना जोडण्यासाठी कशा प्रकारे या अ‍ॅपचा वापर केला आहे. फेसबुकच्या मालकीची कंपनी व्हॉट्सअ‍ॅपचा लॉकडाऊन दरम्यान बऱ्याच लोकांनी केवळ मेसेजिंगसाठीच नव्हे तर व्हिडिओ कॉलिंगसाठीही वापर केला आहे.

व्हॉट्सअ‍ॅपने ‘It’s Between You’ या ब्रँड मोहिमेसाठी बॉलिवूडची दिग्दर्शक गौरी शिंदे आणि जाहिरात एजन्सी बीबीडीओ इंडियाची निवड केली आहे. या मोहिमेच्या माध्यमातून कंपनी काही जाहिराती दाखवेल आणि या जाहिरातीत दाखवतील कि मेसेज, व्हॉईस कॉल आणि व्हिडीओ कॉलने एकमेकांना कसे जोडून ठेवले. भारतात व्हॉट्सअ‍ॅपच्या ऍक्टिव्ह युजर्सची संख्या ४० कोटीहून अधिक आहे आणि व्हॉट्सअ‍ॅपसाठी भारत एक मोठी बाजारपेठ आहे.

फेसबुक इंडियाचे संचालक अविनाश पंत यांनी सांगितले की, ‘या मोहिमेच्या माध्यमातून आम्ही काही सत्य कथा लोकांसोबत शेअर करू आणि व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून दररोज भारतीय त्यांच्या जवळच्या लोकांशी कसे संपर्कात राहतात याविषयी सांगतील.’ ते असेही म्हणाले की, ‘व्हॉट्सअ‍ॅप हे त्यांच्या कुटुंबापासून आणि मित्रांपासून दूर असलेल्या लोकांना आयुष्यासारखे आहे. अशा परिस्थितीत व्हॉट्सअ‍ॅप हे आपल्या प्रियजनांशी संवाद साधण्याचे उत्तम माध्यम आहे.’

तसेच त्यांनी हेही सांगितले की, व्हॉट्सअ‍ॅपवर एक जाहिरात अशीही असेल जी वृद्ध महिला आणि तिच्या काळजीशी संबंधित आहे. भारतापूर्वी व्हॉट्सऍपने यावर्षी ही मोहीम ब्राझीलमध्येही चालवली होती. तसेच हेही स्पष्टीकरण दिले गेले आहे की, ही मोहीम संपूर्ण भारतात अनेक राष्ट्रीय आणि प्रादेशिक चॅनेल्ससह डिजिटल प्लॅटफॉर्मवर १० आठवडे चालवली जाईल.