खुशखबर ! YouTube नं यूजर्सला दिली शानदार भेट ! आता ‘फ्री’मध्ये पाहू शकता चित्रपट

पोलीसनामा ऑनलाईन : यूट्यूबने ट्रीबेका एंटरप्रायजेसच्या संयुक्त विद्यमाने ‘We are one’ फिल्म फेस्टिव्हलची घोषणा केली आहे. या फिल्म फेस्टिवलमध्ये 10 दिवस जगभरात अनेक नवीन चित्रपट दाखवले जातील. लॉकडाऊन दरम्यान सुरू केलेला हा उपक्रम वापरकर्त्यांना नक्कीच आवडेल. विशेष म्हणजे या फेस्टिव्हल अंतर्गत नवीन आणि क्लासिक चित्रपट दाखविले जातील. महत्वाचे म्हणजे, वापरकर्त्यांनी यासाठी कोणतेही स्वतंत्र पैसे देण्याची गरज नाही.

गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी ट्विटरद्वारे पोस्ट सामायिक करून ‘We are one’ ग्लोबल फिल्म फेस्टिव्हल सामायिक केला आहे. या ट्वीटमध्ये सांगण्यात आले आहे की, हा फेस्टिव्हल 10 दिवस चालेल. 29 मे ते 7 जूनपर्यंत आपण हा फेस्टिव्हल पाहू शकता. यात कोणत्याही एका देशातील नाही तर जगभरातील चित्रपटांचा समावेश आहे. यूट्यूब 10 दिवस या फेस्टिवलचे आयोजन करेल.

ट्रीबिका इंटरप्राइजेज आणि यूट्यूबच्या या ‘We are one: A ग्लोबल फिल्म फेस्टिवल या कार्यक्रमामध्ये , बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, सनडान्स फिल्म फेस्टिव्हल, सिडनी फिल्म फेस्टिव्हल, टोकियो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल, टोरोंटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल, ट्रीबेका फिल्म फेस्टिव्हल, वेनिस फिल्म फेस्टिवल, न्यूयॉर्क चित्रपट महोत्सव आणि कान्स फिल्म फेस्टिवल समाविष्ट आहे.

दरम्यान,कोविड -19 साठी मदत निधी जमा करणे हा या चित्रपट महोत्सवाचा उद्देश आहे. युट्यूबवर देण्यात आलेल्या माहितीनुसार, ग्लोबल फिल्म फेस्टिवलच्या 10 दिवसात जगभरातील 20 हून अधिक फिल्म फेस्टिवल डिस्कवर केले जातील आणि पाहता येतील. उत्सवाच्या काळात जमा झालेला निधी कोविड -19 मदत निधीला दिला जाईल. ‘we are one : A ग्लोबल फिल्म फेस्टिव्हल’ चा भाग होण्यासाठी आपल्याला चॅनेलची सदस्यता घ्यावी लागेल. ही सेवा पूर्णपणे विनामूल्य आहे आणि त्यासाठी कोणतेही शुल्क द्यावे लागत नाही.