इतरांच्या बेडरूममधील Video पाहण्यासाठी टेक्निशियनने 200 घरांचे CCTV केले हॅक

पोलीसनामा ऑनलाईन टीम : सुरक्षा यंत्रणा पुरविणाऱ्या एक कंपनीच्या टेक्निशियनने सुमारे 200 घरांचे सीसीटीव्ही हॅक केले आणि त्यानंतर या जोडप्यांचे व महिलांच्या वैयक्तिक क्षणांवर नजर ठेवण्यास सुरुवात केली. असे म्हटले जाते की, 35 वर्षांच्या टेक्निशियनने जवळजवळ 9600 वेळा ग्राहकांच्या खात्यावर प्रवेश केला. लोकांच्या घरांचे सीसीटीव्ही हॅक करण्याचे प्रकरण अमेरिकेतील टेक्सासचे आहे. टेलीस्फर एव्हिलेस नावाचा हा टेक्निशियन एडीटी कंपनीत काम करत होता. ही कंपनी घरे आणि कार्यालयांसाठी सिक्युरिटी अलार्म सिस्टीम प्रदान करते. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये एव्हिलेजला काढून टाकण्यात आले होते.

गुरुवारी अमेरिकेच्या कोर्टामध्ये झालेल्या सुनावणीदरम्यान एव्हिल्सने कबूल केले की, तो ग्राहकांची हेरगिरी करीत असे. सुमारे साडेचार वर्षांपासून तो हे करत होता. दोषी ठरल्यास एव्हिलेस 5 वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. एव्हिल ग्राहकांच्या प्रोफाइलमध्ये त्याचा ईमेल आयडी जोडत असत ज्याद्वारे तो ग्राहकांच्या सीसीटीव्हीमध्ये प्रवेश करू शकला. तो ग्राहकांचे इन्टिमेट क्षण लाईव्ह पाहत असे.

एनव्हिल्स ग्राहकांना सांगायचा की, सिस्टम टेस्ट करण्यासाठी त्यांना तात्पुरता आपला ईमेल आयडी जोडण्याची आवश्यकता आहे. दरम्यान, त्याने अनेक ग्राहकांना न सांगता आपला ईमेल आयडी जोडला होता. टेक्सासच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, इव्हिल्स प्रथम अशा नोट्स बनवायच्या ज्यामध्ये सुंदर महिला राहतात, त्यानंतर त्यांच्या खाजगी क्षणांचे व्हिडिओ लाइव्ह पाहायचा. गेल्या वर्षी मे महिन्यात बर्‍याच ग्राहकांनी कंपनीवर खटला करण्याविषयी बोलले होते.