आता कुणा दुसर्‍याच्या लिव्हरची आवश्यकता नाही, लॅबमध्ये केले तयार; वेटिंग लिस्टपासून सुटका

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   आता त्या लोकांना अडचण येणार नाही ज्यांचे लिव्हर खराब होते. शास्त्रज्ञांनी प्रयोगशाळेत लिव्हर बनवण्याचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. ब्राझीलच्या साओ पावलो युनिव्हर्सिटीच्या इंस्टीट्यूट ऑफ बायो-सायन्सेसच्या ह्यूमन जीनोम अँड स्टेम सेल रिसर्च सेंटरने हे तंत्रज्ञान विकसित केले आहे. आता सायंटिस्ट लिव्हरची पुन्हा निर्मिती, दुरूस्ती आणि उत्पादन लॅबमध्ये करू शकतात.

शास्त्रज्ञांनी उंदराचे यकृत (लिव्हर) लॅबमध्ये बनवले आहे. आता शास्त्रज्ञ हे तंत्रज्ञान आणखी अत्याधुनिक आणि अचूक बनवून मनुष्याचे लिव्हर निर्माण करण्याच्या प्रक्रियेत गुंतले आहेत. शास्त्रज्ञांना आशा आहे की ते लॅबमध्ये लिव्हर बनवून जगातील एका मोठ्या समस्येचे निराकरण करण्यात 100 टक्के यशस्वी होतील. जर हे यश मिळाले तर प्रयोग शाळांमध्ये विकसित लिव्हरचे प्रत्यारोपण केले जाऊ शकते.

लॅबमध्ये विकसित उंदराच्या लिव्हरचे संशोधन मटेरियल्स सायन्स अँड इंजिनियरिंग : सी मध्ये प्रकाशित झाले आहे. हे संशोधन करणारे प्रमुख शास्त्रज्ञ लुईज कार्लोज डी कॅयर्स ज्युनियर यांनी म्हटले की, आम्ही मनुष्यांमध्ये प्रत्यारोपित करण्यालायक लिव्हरचे लॅबमध्ये मोठ्या प्रमाणात उत्पादन करणार आहोत.

लुईज यांनी म्हटले की, यामुळे त्या लोकांना सर्वात जास्त फायदा होईल ज्यांना लिव्हर ट्रान्सप्लांटसाठी उपयुक्त डोनर आणि अनेक प्रकारच्या मेडिको-लीगल बाबत प्रतिक्षा करावी लागते. सध्या आम्ही हा प्रयत्न करत आहोत की लॅबमध्ये असे लिव्हर बनवले जावे जे मनुष्याच्या शरीरानुसार योग्य बसेल. ते कोणत्याही मनुष्याचे शरीर रिजेक्ट करणार नाही.

लुईज यांनी म्हटले की, असे लिव्हर बनवण्यासाठी डिसेल्यूलायजरेशन म्हणजे बायोमेडिकल इंजिनियरिंगने एक्स्ट्रासेल्यूलर मॅट्रिक्सला ऊतींपासून वेगळे करायचे आहे यानंतर ज्या रूग्णासाठी लिव्हर बनवायचे आहे त्याच्या नुसार रिसेल्यूलायजरेशन म्हणजे एक्स्ट्रासेल्यूलर मॅट्रिक्सला उपयुक्त बनवायचे आहे.