काय सांगता ! होय, आता 6G येणार, ‘या’ देशात इंटरनेट ‘सुसाट’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 2G, 3G, 4G आणि आता चर्चा सुरु झाली ती 5G ची. परंतु आता 5G सोडा 6G इंटरनेट सेवा लॉन्च करण्याची तयारी सुरु झाली आहे. जगभरात 5G चे नेटवर्क मजबूत करण्यावर काम सुरु असताना जपानने याबाबत बाजी मारत 6G नेटवर्कवर काम करण्यास सुरुवात केली आहे. 6G चे नेटवर्क 5G पेक्षा 15 पट जास्त वेगाने काम करेल अशी माहिती मिळत आहे.

जगभरात 5G नेटवर्कवर काम सुरु आहे. अशात जपान हा देश इंटरनेटच्याबाबतीत इतरांच्या पुढे आहे. जपानमध्ये येत्या काही काळात 6G नेटवर्कवरील इंटरनेटचा वापर लोक करु लागतील. 6G चे नेटवर्क 5G पेक्षा 15 पट जास्त वेगाने काम करेल आणि ते 2030 पर्यंत लॉन्च करण्यात येईल. या नेटवर्कवर काम करण्यासाठी जपानने मिनिस्ट्री ऑफ इंटरनल अफेअर्स अँड कम्युनिकेशन्स ऑफ जपान गव्हर्नमेंट सिव्हीलियन सोसायटी ऑफ रिसर्चची स्थापना केली आहे. यासाठीची आर्थिक तरतूद देखील जपानकडून करण्यात आली आहे.

चीन, दक्षिण कोरिया, फिनलँड हे देश देखील 5G पेक्षा आधिक वेगाने चालणारे 6G नेटवर्क तयार करण्याच्या प्रयत्नात आहेत. सध्या जगभरात 5G नेटवर्कवर काम सुरु आहे, हे नेटवर्क 4G नेटवर्कपेक्षा 20 पट अधिक वेगाने काम करेल. या नेटवर्कच्या मदतीने एक संपूर्ण एचडी चित्रपट काही सेकंदात डाऊनलोड करता येईल. भविष्यात स्वयंचलित कारमध्ये देखील या 5G तंत्रज्ञानाच्या वापर करण्यात येईल.

तीन सरकारी कंपन्यांनी चीनमध्ये 1 नोव्हेंबर पासून 5G सेवा सुरु केली आहे. तर चायना मोबाइलने बीजिंग, शांघाय आणि शेनझेनसह 50 शहरात 5G सेवा सुरु करत असल्याची घोषणा केली होती. ग्राहकांना या सेवेसाठी दरमहा 128 युआन म्हणजेच 1300 रुपये मोजावे लागतील. चीनमधील चायना टेलिकॉम आणि चायना युनिकॉर्न यांनी देखील ग्राहकांना विविध योजना आणि ऑफर्स देत 5G सेवा सुरु केली आहे. बीजिंगमध्ये पार पडलेल्या तंत्रज्ञान परिषदेत अधिकाऱ्यांनी तीन 3 सरकारी कंपन्या 5G सेवा सुरु करणार असल्याची घोषणा केली होती.

फेसबुक पेज लाईक करा –