WhatsApp Web शी संबंधित आलं नवीन ‘फीचर’, आता डेस्कटॉपवरूनही करू शकाल ‘व्हिडिओ’ आणि ‘ऑडिओ’ कॉल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅप (Whatsapp) अलीकडेच आपल्या पॉलिसीबाबत वापरकर्त्यांच्या निशाण्यावर राहिले आहे. यामुळेच गोपनीयतेचे उल्लंघन होत असल्याचे पाहून अनेकांनी व्हॉट्सअ‍ॅप सोडण्यास सुरवात केली. पण आता व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या वापरकर्त्यांना आकर्षित करण्यासाठी अ‍ॅपमध्ये बर्‍याच नवीन फीचर्सची भर घातली आहे. अलीकडेच व्हॉट्सअ‍ॅपने आपले डेस्कटॉप व्हर्जन व्हॉट्सअ‍ॅप वेब (Whatsapp WEB) वर व्हिडिओ आणि कॉलिंग फीचर सुरू केले आहे. या फीचरच्या मदतीने व्हॉट्सअ‍ॅप यूजर्स आता डेस्कटॉपवरून व्हॉट्सअ‍ॅप कॉलिंगचा आनंद घेतील. तथापि, हे वैशिष्ट्य सध्या केवळ काही निवडक वापरकर्त्यांसाठी उपलब्ध केले गेले आहे आणि त्याची चाचणी घेण्यात येत आहे.

https://publish.twitter.com/?url=https://twitter.com/WABetaInfo/status/1352318477277736960

कोरोना काळात अधिक लोकप्रिय झाले व्हिडिओ कॉलिंग

कोरोना काळात जेव्हा जगभरात लॉकडाऊन लादले गेले होते, तेव्हा व्हिडिओ कॉलिंग फीचर अधिक वापरले जाऊ लागले. घरांमधील लोक एकमेकांशी संपर्क साधण्यासाठी व्हिडिओ कॉल अधिक वापरत असत. ही सुविधा केवळ व्हॉट्सअ‍ॅपच्या मोबाइल अ‍ॅपवर उपलब्ध होती. डेस्कटॉपवरून कॉल करण्यासाठी झूम (Zoom) आणि गुगल मीट (Google Meet) वापरले जात होते, पण आता व्हॉट्सअ‍ॅपच्या डेस्कटॉप व्हर्जनमधून देखील व्हिडीओ आणि ऑडिओ कॉलिंग फीचर्स सादर करण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत असे म्हटले जात आहे की जर हे फीचर्स सर्वांसाठी सुरू केले तर झूम आणि गुगल मीट यांच्याबरोबर कडक स्पर्धा होईल.

WABetaInfo ने केला खुलासा

व्हॉट्सअ‍ॅपच्या नव्या फीचरची माहिती WABetaInfo ने दिली आहे. WABetaInfo ने सांगितले की व्हॉट्सअ‍ॅपने डेस्कटॉप वरून व्हिडीओ व ऑडिओ कॉलिंग फीचर रोलआऊट केले आहे, सोबतच काही वापरकर्त्यांनी याचे स्क्रीन शॉट देखील शेअर केले आहेत, ज्यामध्ये व्हॉट्सअ‍ॅपच्या डेस्कटॉप व्हर्जनवर ऑडिओ व व्हिडीओ कॉलिंग फीचर दिसत आहे. सध्या हे फीचर बीटा व्हर्जनमध्ये रोलआऊट करण्यात आले आहे, म्हणूनच काही निवडक वापरकर्तेच त्याचा लाभ घेण्यास सक्षम असतील. व्हॉट्सअ‍ॅपने आधीच घोषणा केली होती की सन 2021 मध्ये वापरकर्त्यांना डेस्कटॉप कॉलिंगची सुविधा देण्यात येणार आहे.