WhatsApp चा मोठा निर्णय ! 15 सेकंदात 100 मेसेज पाठविणाऱ्यावर होणार ‘कायदेशीर’ कारवाई

पोलीसनामा ऑनलाइन टीम – फेसबुकच्या मालकीच्या व्हॉट्सअ‍ॅपने बल्क मेसेज पाठवणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्याची तयारी सुरु केली आहे. व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या ब्लॉगमध्ये असे म्हटले आहे की, मोठ्या प्रमाणात मेसेजेस पाठवल्यास व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंट बंद करण्यात येईल. तसेच मोठ्या प्रमाणात मेसेज पाठवणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
तसेच इस्टंट ग्रुप तयार करणाऱ्यांवरही अशा प्रकारची कारवाई केली जाणार आहे.

मात्र, व्हॉट्सअ‍ॅपचा हा निर्णय फक्त बिझनेस अकाऊंटसाठी आहे. उदाहरणार्थ, जर पाच मिनिटांपूर्वी बिझनेस व्हॉट्सअ‍ॅपवर ग्रुप तयार केला असेल आणि त्या ग्रुपमधून 15 सेकंदाला 100 मेसेज पाठवले गेले असतील तर कंपनी अशा ग्रुपवर कारवाई करेल. तसेच कंपनी व्हॉट्सअ‍ॅप बंद करु शकते.

याशिवाय काही मिनीटात डझनभर ग्रुप तयार करणाऱ्या व्हॉट्सअ‍ॅप युजर्सवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. वास्तविक व्हॉट्सअ‍ॅपने स्पॅम मेसेजेस तपासण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. हा नियम 7 डिसेंबर पासून लागू झाला आहे. विशेष म्हणजे काही महिन्यापूर्वी व्हॉट्सअ‍ॅपने स्पॅम आणि बल्क मेसेजेसवर आळा घालण्यासाठी बल्क मेसेज फॉरवर्ड करणे थांबवले होते. यामुळे एक व्यक्ती एकावेळी फक्त पाच जणांना मेसेज पाठवू शकत आहे.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/